Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

बुकमायकॅब कार रेंटलला देशांतर्गत विमानतळापासून अन्य भागांत वाहतूक सेवा पुरवण्यासाठी पोलिसांची मंजुरी

MH20LIVE.COM

पुणे : बुकमायकॅब कार रेंटलला शहरातील देशांतर्गत विमानतळापर्यंत तसेच विमानतळापासून वाहतूक सेवा पुरवण्यासाठी पुणे पोलिसांची मंजुरी मिळाली आहे. कंपनी आता डिजिटल झाली असून बूक२राइड हे जागतिक दर्जाचे अॅप कंपनीने लाँच केले आहे. यामुळे टॅक्सी व रिक्षाचालकांसह ग्राहकांसाठीही वाहन बुक करण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे. वाहतूक पोलिस विभागातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांची मंजुरी कंपनीला प्राप्त झाली आहे. बूक२राइड हे अॅप आयओएस आणि अँड्रॉइड फोन्सवर डाउनलोडिंगसाठी मोफत उपलब्ध आहे. या अॅपला एका २४x७ कॉल सेंटरचे पाठबळ आहे (०२० ६६१००१००). हे सुलभ एका टॅपने वापरता येणारे बुकिंग अॅप “मेक इन इंडिया” उपक्रमाद्वारे विकसित करण्यात आले आहे. साथीच्या काळात शहरात प्रवास करणे आव्हानात्मक झाले असल्याने याबाबतीतील पुणेकरांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न हे अॅप करणार आहे. वापरकर्त्यांसाठी वाहनभाड्यांत कोणत्याही प्रकारे वाढ (सर्ज प्रायसिंग) केली जाणार नाही. प्रवाशांकडून टॅक्सीसाठी किलोमीटरमागे १८ रुपये एवढे भाडे घेतले जाईल. रात्रीच्या वेळचे भाडे २५ टक्के अधिक असेल.

पहिल्या टप्प्यात ताफ्यामध्ये २५० हून अधिक वाहने उपलब्ध आहेत. यांमध्ये रिक्षा आणि कार्स दोहोंचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ग्राहकांच्या प्रतिसादानुसार १००० हून अधिक वाहनांची भर घातली जाईल. स्त्री तसेच एलजीबीटी चालकांना टीममध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात कंपनीला विशेष आनंद आहे.

शहरातील कॅब आणि टॅक्सी चालकांना ३० ते ४० टक्के अधिक पैसे कमावण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट या अॅपपुढे आहे. शहरातील अन्य रेडिओ कॅब सेवा पुरवठादार हे करत नाहीत. यातील सर्वांत अनोखे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहक मीटरनुसार थेट चालकांनाच पैसे देतात. चालकांना बुकिंग एजन्सीद्वारे पैसे दिले जात नाहीत. त्यामुळे सेवाशुल्क, भलेमोठे कमिशन कापले जाईल अशी भीती चालकांनी बाळगण्याचे कारण नाही. ग्राहकांसाठीही या अॅपमध्ये सुरक्षितता सुविधा आहेत. पॅनिक अॅलर्ट्स तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांकाची सुविधा आहे. वाहने प्रत्येक ट्रिपनंतर निर्जंतुक केली जातात. चालक मास्क आणि हॅण्डग्लोव्ह्ज वापरतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close