Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सत्तारांच्या ताब्यात असलेल्या नगर परिषद विरोधात भाजपचा रास्ता रोको..आंदोलन

नगर परिषद प्रशासनाने अतिरेक केल्यास रुमण हातात घेऊ-सांडू पाटील

सिल्लोड :नगर परिषद प्रशासनाणे भाजपा शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या अधिकृत बांधकामावर अनधिकृतपणे बुलडोजर चालवीला आहे नगर परिषद प्रशासनाचा हा मनमानी कारभार सहन करणार नाही यापुढे जर हा मनमानी कारभार थांबविला नाही तर न .प च्या विरोधात हातात रुमण घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा भाजपचे माजी आ सांडू पाटील लोखंडे यांनी दिला.दि 12 शुक्रवार रोजी दुपारी सिल्लोड येथे न .प प्रशासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वाचा सविस्तर news शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार

रास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल दिड तास रस्त्यावर वाहने रस्त्यावर अडकून पडली होती.यावेळी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना देण्यात येऊन सदरील प्रकारणाविरोधात शहर पोलीस ठाणे येथे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी तक्रार दिली.यावेळी प्रदेश कार्यकारीणी सदस्य सुरेश बनकर, प्रदेश चिटणीस इद्रीस मुलतानी,शहराध्यक्ष कमलेश कटारिया,सुनील मिरकर,मकरंद कोरडे,अशोक तायडे,मनोज मोरेल्लू यांनी केवळ भाजपा कार्यकर्ते हे सत्तार यांच्या विरोधात काम करीत असल्याने नगर परिषद प्रशासन हे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या बोलण्यावरून कार्यवाही करीत असल्याचा आरोप यावेळी केला..

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण सामायिक प्रवेश परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याचे आवाहन

यावेळी किसान मोर्चाचे संजय डमाळे,पं. स. सदस्य अनिल खरात,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद मंडलेचा, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.प्रकाश नवाल,दादाराव आळणे, विष्णू काटकर, संतोष ठाकूर, शामराव आळणे, भाजपा शहर सरचिटणीस मधुकर राऊत,गणेश भूमकर, मयूर कुलकर्णी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष किशोर गवळे, शहराध्यक्ष अरुण राठोड, भाजपा शहर उपाध्यक्ष राजू गायकवाड, अमोल ढाकरे, मोतीराम मिसाळ, भाऊ गोमटे, नंदकुमार श्रीवास्तव, मधुकर जाधव, प्रकाश भोजवानी, वैभव स्नानसे, किरण शिरसाठ, योगेश सोनवणे, योगेश पवार,स्वप्नील शिनगारे, कृष्णा अहिरराव, उमेश सरोदे, पवन स्नानसे, आकाश खंडागळे, सुनील आरके, विजय माळकरी, सागर निकम, सुभाष साळवे, योगेश ढोरमरे, दयानंद संसारे आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग,गॅस सिलेंडरचा स्फोट मोठी हानी टळली


पोलिसांनी घेतले ताब्यात…….

भाजपा पदाधिकारी यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत नगर परिषद कार्यालय कडे जाण्याचा निर्णय घेताच पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले.पोलीस ठाण्यात समज देऊन सर्वांना सोडण्यात आले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close