Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

वाढीव वीज-बिल वसुली व वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देणाऱ्या वितरण कंपनीच्या विरोधात भाजपाचे भोकरदन येथे ‘‘टाळा ठोको चेतावणी’’ आंदोलन


भोकरदन/सुरेश गिराम
राज्यातील जनतेला सरकारने लाॅकडाऊनच्या काळात भरमसाठ वीजबिले दिली आहे. कोरोना विषाणुच्या संक्रमणामुळे अगोदरच आर्थिक संकटामध्ये असलेल्या जनतेला एक प्रकारे वाढीव वीजबिलांचा शाॅक देण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकाने केले आहे. ऊर्जामंत्री मा.ना. नितीन राऊत यांनी लाॅकडाऊनच्या काळामध्ये वीज ग्राहकांना 100 युनिट पर्यंत मोफत वीजपुरवठा करण्याचे राज्यसरकारच्या हवाल्याने आश्वासन दिले होते.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

परंतु त्यांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे  लाॅकडाऊन काळातील प्रलंबीत अव्वाच्या सवा बीले ग्राहकांना देण्यात आली असुन विद्युत वितरण कंपनी सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या सपाटा लावला आहे. जे ग्राहक या दंडेलशाही विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत आहे त्यांना विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देण्यात येत आहे.
हेही वाचा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी

त्यामुळे जनतेमध्ये तिव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, भोकरदनच्या वतीने शुक्रवार  दि.05/02/2021 रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ.संतोष पाटील दानवे यांच्या सुचनेनुसार लोकशाही मार्गाने  उपकार्यकारी अभियंता दिपक तुरे यांना घेराव घालुन निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये वीज वितरण कंपनीने टाळेबंदीच्या काळातील  ग्राहकांना दिलेल्या वाढीव बीलांचा निषेध करुन वीज वितरण कंपनीकडुन सक्तीने वीज बिलांची वसुली करण्यात येत असल्यामुळे सामान्य नागरीकांमध्ये असंतोष खदखदत असल्याचे वीज वितरण कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आनुन देण्यात आले.
हेही वाचा नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी वर्णी

तसेच टाळेबंदीच्या काळातील वाढीव वीज बिले वीज वितरण कंपनीने पूर्णतः माफ करुन सक्तीने करण्यात येणारी वीज बील वसुली तात्काळ थांबविण्यात यावी अन्यथा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात तीव्र अंदोलन छेडुन वीज वितरण कंपनीला टाळे ठोकण्यात येईल असा परखड इशारा या निवेदनाच्या माध्यमातुन वीज वितरण कंपनीला देण्यात आला आहे.
हेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

यावेळी भाजपाचे माजी उपजिल्हाध्यक्ष मुकेश चिने, रामेश्वर सहकारी साखर कारखाण्याचे व्हाईस चेअरमन दादाराव राऊत, भाजपा आध्यात्मिक जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनुने, भाजयुमो तालुका अध्यक्ष दिपक जाधव, शहराध्यक्ष सतिष पा. रोकडे, भाजयुमो शहराध्यक्ष दिपक मोरे, पं.स.सभापती विनोद गावंडे, गणेश ठाले, रणविर देशमुख, संजय पोफळे, आप्पासाहेब तळेकर, विकास बोर्डे, शिवा चोपडे, संजय देशपांडे, अस्लम शहा, साबेर शहा, अमर शहा, रफीक शहा, शेख इरफान, संजय गिरी, कैलास बडक, बाबु तळेकर, एजाज पठाण, शंकर सपकाळ, सुरज सहाणे, बाबुराव सोनुने, सुभाश वराडे, किशोर जाधव, रमेश बिरसोने, समाधान शेरकर, स्वप्नील खरात, विशाल तळेकर, रंजित जाधव, संतोष वाघ, विनोद मिरकर, रामेश्वर चिकटे, कैलास ढवळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक


विद्युत वितरण कंपनी व पर्यायाने राज्यसरकारने  मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या टाळेबंदीच्या काळातील शेतकऱ्यांसह छोटे मोठे व्यावसायीक व सर्वसामान्य नागरीकांच्या घरगुती वीजपुरवठायाचे बिले सरसकट माफ करावीत व राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत येई पर्यंत घरगुती ग्राहकांना 100 युनीट पर्यंतचा पुरवठा मोफत दयावा, सक्तीने वीज बीलांची होणारी वसुली तात्काळ थांबवुन ग्राहकांची वीज कनेक्शन तोडु नये अशा प्रकारच्या मागण्या सदर निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आल्या आहेत. सदर मागणीचा विचार करुन राज्यसरकारने व विद्युत वितरण कंपनी गांर्भियाने विचार करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यातील शेतकरी, छोटे मोठे व्यावसायीक व सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरुन तिव्र अंदोलन छेडेल व विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकेल असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातुन राज्यसरकार व विद्युत वितरण कंपनीला देण्यात आला आहे.
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close