Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

देवगाव खवणे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा सफाया

जय मल्हार परिवर्तन विकास पॅनल सर्व जागांवर विजयी


मंठा / अनिल बा खंदारे देवगाव खवणे ता. मंठा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पंचायत समिती सदस्य तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या जय मल्हार परिवर्तन विकास पॅनलने  9 पैकी 9 जागा जिंकून इतिहास घडविला.  या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा सुपडा साफ झाला. देवगाव खवणे ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, या सर्कल मध्ये पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे सर्वसामान्य जनतेची कामे करतात त्यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार परिवर्तन विकास पॅनलमधील संदीप शिवाजीराव मोरे, वसंत रामभाऊ मोरे, सौ दमयंती बंडूनाना मोरे, वर्षा संतोष खवणे, शकुंतला आबासाहेब खवणे, लक्ष्मण अंबादास चिंतामणी, शांताबाई लक्ष्‍मण चिंतामणी, इंदुबाई विठ्ठल दाहीजे,  नंदा बबन साळवे हे नऊ उमेदवार विजयी होऊन ग्रामपंचायत वर एक हाती सत्ता मिळविली. निवडणूक निकालानंतर सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचे आमदार राजेश राठोड, शिवसेना जिल्हाप्रमुख ए जे बोराडे, बाजार समितीचे संचालक प्रल्हादराव बोराडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नीळकंठ वायाळ यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीसाठी किसनराव मोरे यांच्यासह अण्णासाहेब मोरे, कैलास मोरे, ध्रुवप्रसाद मोरे, दत्ता मोरे, महेश मोरे, तातेराव मोरे, शिवाजीराव मोरे, नामदेव मोरे, प्रकाश खवणे, बाळू मोरे, पिंटू खंदारे, गणेश खवणे ,राजेभाऊ खवणे, जगनराव खवणे, गोविंदराव खवणे, निवृत्ती खवणे, भगवान खवणे दीपक खवने,  सतीश खवणे, जीवन चिंतामणी, मारुती दहिजे, अण्णा साळवे, महादेव साळवे, धर्मा राठोड, मदन चव्हाण, हरिभाऊ साळवे यांनी परिश्रम घेतले.

 ही निवडणूक आम्ही विकास कामांच्या जोरावर जिंकली असून

विरोधकांनी मागील पाच वर्षात गावाचा विकास केला नाही, त्यांनी कुठल्याच प्रकारची जनतेची कामे केली नाहीत याउलट आम्ही गावचे सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रश्न सोडविले सर्वसामान्य लोकांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढविली मागील वीस वर्षापासून जनता आम्हाला निवडून देत आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि मतदारांच्या विश्वासावर लढली म्हणून आम्हाला हे यश मिळाले अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे यांनी दिली

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close