Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

‘यशाचे शिखर चढत असताना पायाचे दगड का ढासळतात याचा भाजपने विचार करावा’- उद्धव ठाकरे


उस्मानाबाद/mh20live

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तुळजापूर येथील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत भाजपला टोला लगावला. ‘यशाचे शिखर चढत असताना पायाचे दगड का ढासळतात याचा भाजपने विचार करावा,’असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच, एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत. त्याचे स्वागतच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यादरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, खडसे स्पष्ट वक्ते आहेत आणि लढवय्ये आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपची पाळंमुळे रोवली. पण, खडसेंसारखा नेता पक्ष का सोडतो, पक्षाची पाळंमुळे रोवणारी माणसे का सोडून जात आहेत? याचा विचार भाजपने केला पाहिजे. यशाची शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड ढासाळतात , याचा भाजपने विचार करावा. नवीन अंकुर फुटताना मुळंच का उखडली जाताहेत, याचाही त्यांनी विचार करावा. आम्ही एकेकाळी त्यांचे मित्र होतो. त्यामुळे त्यांना हा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close