Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

भाजपा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू -जयंत पाटील

mh20live Network
मुंबई :भाजपा हा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू हा प्रश्न आम्हाला कालपासून पडला आहे. देवेंद्र फडणवीस हे कोविड आणि करोनाच्या संकटात महाराष्ट्र सरकारच्या पाठिशी उभे राहतील असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने तसं झालं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेली आकडेवारी चांगली आहे मात्र त्यात तथ्य नाही असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. नुसती आकडेवारी सादर करण्यापेक्षा आम्हाला साथ द्या. तसं झालं तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरणार नाही असा टोलाही पाटील यांनी लगावला.

करोनाच्या काळात ठाकरे सरकार खूप चांगलं काम करतं आहे. सध्याच्या घडीला देशात सर्वाधिक चाचण्या या महाराष्ट्रात होत आहेत. मुंबईत करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयंही उभी करण्यात आली आहेत. गुजरातची अवस्था किती बिकट आहे ते जरा बघा. मला स्पर्धा करण्याची गरज वाटत नाही मात्र महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधली स्थिती अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्राचं अनुकरण हे देशातील इतर राज्यंही करू लागली आहेत. अशा काळात फडणवीस यांनी राजकारण करु नये. उलट या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी अजूनही वेळ गेलेली नाही असंही पाटील यांनी स्पष्ट केलं.

मजुरांना घरी जाण्यासाठी मुख्यमंत्री निधीतून पैसे देण्यात आले. आम्ही ज्या ज्या सुविधा मागितल्या त्या आम्हाला पुरेशा प्रमाणात मिळाल्या नाहीत अशी खंतही जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.
————————
केंद्र सरकारने आतापर्यंत राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत केली असा दावा राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला केला होता. त्याला आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.फडणवीसांनी कशी दिशाभूल केली? त्याची सविस्तर माहिती दिली.

– पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत गहू, तांदूळ आणि डाळ मिळून राज्य शासनाला मोठी मदत केल्याचं सांगितलं. पण हा निर्णय महाराष्ट्रापुरता नाही. देशासाठी निर्णय झाला.  देवेंद्र फडणवीस काल म्हणाले होते की, राज्याला १७५० कोटी रुपयाचे गहू केंद्राने दिले पण हा गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेला नाही.

– १२२ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिल्याचं सांगितलं. एफसीआयमधून धान्य निघालेलं नाही. मजुर गावी पोहोचले आहेत. त्यामुळे हे पैसे मिळण्याचा प्रश्नच नाही.

– प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतंर्गत १७२६ कोटी रुपये दिले. पण ही योजना आधीपासूनच लागू आहे. सहा हजारमधील दोन-दोन हजार रक्कम टप्याटप्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होती. त्यात महाराष्ट्रासाठी वेगळं काही नाही.

– दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना केंद्राने ११६ कोटी रुपये दिले. पण २० टक्के रक्कम केंद्र सरकार देते. त्याचबरोबर १२१० कोटी महाराष्ट्र सरकारने दिले. पण देवेंद्र फडणवीस हे सोयीस्कररित्या विसरले.

– महाराष्ट्रातून ६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या मजुरांचा सगळा ट्रेन प्रवासाचा ६८ कोटी रुपये खर्च राज्याने केला. केंद्राकडून एकही पैसा मिळालेला नाही.

– महाराष्ट्र सरकारला २०१९-२० सालचे हक्काचे १८२७९ कोटी रुपये आणि आता एप्रिल-मे चे २३६९ कोटी मिळालेले नाहीत. ते दिले तरी पुरेसं आहेत. आम्ही या मागणीसाठी केंद्राकडे सतत पाठपुरावा करतोय.

– ४२ हजार कोटींची अपेक्षा होती पण  नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनमुळे २४ हजार कोटींची तूट आहे.

– महाराष्ट्राला जीडीपीच्या पाच टक्के कर्ज घेता येईल. हे आम्हाला यांच्याकडून शिकावे लागेल?.

– आम्हाला केंद्राने काय दिले? ते कर्ज घेण्याचे सल्ले देत आहेत.

– मजुरांच्या छावण्यांसाठी केंद्राने १६११ कोटी रुपये दिले असं त्यांनी सांगितलं. दरवर्षी डिझास्टर मॅनेजमेंटसाठी केंद्राकडून राज्याला ४६०० कोटी रुपयांचा निधी येतो. त्यातून हे १६११ कोटी रुपये दिले. वेगळे पैसे कुठले दिले?
—————————–
राज्यात काही दिवसांपासून रेल्वे सोडण्यावरून वाद सुरू आहे. या वादावरून अनिल परब यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं. “फडणवीस यांनी सांगितलं की, ‘राज्यातून श्रमिकांसाठी ६०० रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या. यासाठी केंद्र सरकारनं खर्च उचलला. एका रेल्वेसाठी केंद्रानं ५० लाखांचा खर्च उचलला,’ असं फडणवीस यांनी सांगितलं. आता एका रेल्वेला ५० लाख खर्च कसा येतो? हे फडणवीस यांनी सांगावं. प्रत्यक्षात या सर्व ट्रेनचा खर्च महाराष्ट्र सरकारनं दिला आहे. कोणत्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाही. श्रमिकांना घरी सोडण्यासाठी संपूर्ण खर्च राज्य सरकारनं केला,” असे  परब यांनी सांगितले.महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे  १७८ रेल्वे गाड्यांची मागणी केली होती. ३० मे पर्यंत या गाड्या सोडायच्या होत्या. पण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एका दिवसात १४८ रेल्वेगाड्या दिल्या. त्यानंतर काल एकाच दिवसात ४८ रेल्वेगाड्या सोडल्या. परवापर्यंत (२५ मे पर्यंत) सगळं बरं होतं. पण, त्यानंतर मागील दोन दिवसांपासून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूर्वी गाडी सोडण्याच्या एक दिवस अगोदर माहिती राज्य सरकारला दिली जायची. आता सरकारला ते कळवलं जात नाही. काल ११:३० वाजताची रेल्वे १०:३० वाजता सोडली. त्यामुळे मजुरांना ताटकळत बसावं लागलं. गुजरात महाराष्ट्रापेक्षा छोट आहे. पण, १५०० ट्रेन दिल्या, महाराष्ट्राला ६०० ट्रेन दिल्या गेल्या. त्यात रेल्वेच्या वेळा बदलून गोंधळ आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप अनिल परब यांनी केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close