Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात गटबाजी माजली कराड पुत्रांचा पुण्यप्रताप : कार्यकर्त्यालाच झोडपले

औरंगाबाद /mh20live Network
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात गटबाजी माजली असल्याचे चित्र पाहायला मिळत असून आमच्या वॉर्डात मदत वाटण्याचे काम  का करतोस? असा सवाल करत भाजप खासदार भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांनी भाजपच्याच एका निष्ठावंत कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भागवत कराड यांच्या मुलांनी भाजप युवा मोर्चाचा सदस्य कुणाल मराठे या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत कुणाल मराठेच्या घरातील महिलांनादेखील धक्काबुक्की करण्यात आली.या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही तरुण कुणाल मराठेला त्याच्या घरात घुसून बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. ही घटना काल (२३ मे) रात्री साडे दहा वाजेच्या सुमरास घडली आहे.औरंगाबादमधील कोटला कॉलनीच्या समता नगर परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात काल कोरोनाशी संबंधित एक रुग्ण आढळला होता. त्यामुळे या परिसरात कुणाल मराठे या कार्यकर्त्याने सॅनिटायझरची फवारणी केली. याबाबत भागवत कराड यांच्या दोन्ही मुलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बेदम मारहाण केली, असा दावा कुणाल मराठे या तरुणाने केला आहे.या वॉर्डात तू का काम करतोस? भाजपकडून फक्त आम्हीच काम करणार, अशी धमकी देण्यात आली. यानंतर घरात घुसून मारहाण करण्यात आली, असे कुणाल मराठेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतून भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पक्षांतर्गत राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे
 या प्रकरणी कुणाल मराठे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन, वरुण कराड आणि पवन सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close