Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासह ३० आमदार लवकरच महाविकास आघाडीत येणार, अब आयेगा मजा’

भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासह ३० आमदार लवकरच महाविकास आघाडीत येणार, अब आयेगा मजा’


मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये पडणार, अशी भविष्यवाणी करणाऱ्या भाजपला मोठा आता जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपतील एका ज्येष्ठ नेत्यासह ३० भाजप आमदार महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांचा हा दावा खरा ठरला तर ‘मी पुन्हा येईन’चे देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून हा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट हिंदीमध्ये केले आहे. ‘महाराष्ट्र भाजपा के एक ज्येष्ठ नेता के साथ ३० विधायक जल्द ही महाविकास आघाडी में शामील होंगे. अब आयेहा मजा, जय महाराष्ट्र,’ असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर महाविकासआघाडीमध्ये ३० आमदार घेऊन सामील होणार ज्येष्ठ भाजप नेता कोण? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारनाम्यांचा उघडपणे पर्दाफाश करू लागले आहेत. एवढेच नव्हे तर ‘नानासाहेब पंत फडणवीसांचे कारनामे’ असे पुस्तक लिहिणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी  फडणवीसांनी खडसेंच्या रूपात ओबीसी नेतृत्व संपवल्याचा घणाघाती आरोपही केला आहे. त्यामुळे हा ज्येष्ठ नेता नाथाभाऊ तर नाही ना? असा कयास लावला जात आहे.

विशेष म्हणजे ज्या ट्विटर अकाऊंटवरून हा दावाकरण्यात आला आहे ते संजय राऊत यांचे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट नाही. संजय राऊत यांचे व्हेरिफाइड ट्विटर अकाऊंट @rautsanjay61 असे आहे. तर ही पोस्ट @rautsanjay67 या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या नावाने फेक ट्विटर अकाऊंट काढून फेक बातम्या पसरवण्याचा हा ट्रोल आर्मीचा उद्योग असल्याची शंका घेण्यात येऊ लागली आहे.

Sanjay Raut (@rautsanjay67) Tweeted:
महाराष्ट्र भाजपा के एक ज्येष्ठ नेता के साथ 30 विधायक जल्द ही महाविकास आघाडी मैं शामिल होंगे. अब आयेगा मजा
जय महाराष्ट्र!!!

महाराष्ट्र भाजपा के एक ज्येष्ठ नेता के साथ 30 विधायक जल्द ही महाविकास आघाडी मैं शामिल होंगे. अब आयेगा मजा 
जय महाराष्ट्र!!!

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close