औरंगाबाद, : ‘आमची एक 80 वर्षांची आजी हंडा घेऊन मोर्च्यामध्ये होती. झुकेंगा नाही म्हणणाऱ्या 80 वर्षांच्या आजीच्या घरात गेला होता. मग मुख्यमंत्री महोदय, हंडा घेऊन चालणाऱ्या या 80 वर्षांच्या आजींच्या घरात कधी जाणार आहात, हा आक्रोश तुम्हाला कधी समजणार? असा सवाल भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (cm uddhav thackery) केला.
औरंगाबाद पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. पैठण गेटवरून सुरू झालेला मोर्चा हा पालिकेसमोर मोठ्या सभेत पार पडला यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
माझ्या या मोर्चाला परवानगी देताना किती अटी टाकल्यात. इकडे मोर्चा काढायच्या नाही, तिकडे स्टेज उभारयचा नाही. हा जनतेचा आक्रोश आहे, त्याला तुम्ही रोखू शकत नाही. आमचे कार्यकर्ते शिवसेनेचे पोस्टर फाडत होते, तुम्ही यांचा आक्रोश फाडू शकत नाही. नळातून वाफा येत आहे. आज तर आमची एक 80 वर्षांची आजी हंडा घेऊन मोर्च्यामध्ये होती. हंडा घेऊन होती, झुकेंगा नाही म्हणणाऱ्या 80 वर्षांच्या आजीच्या घरात गेला होता. मग मुख्यमंत्री महोदय, हंडा घेऊन चालणाऱ्या या 80 वर्षांच्या आजींच्या घरात कधी जाणार आहात, हा आक्रोश तुम्हाला कधी समजणार, असा सवालच फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला.