Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

भाजपला मोठा धक्का भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. शुक्रवारी दुपारी २ वाजता मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे पक्षप्रवेश करतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. खडसेंच्या या निर्णयाने भाजपला मोठा धक्का मिळाला.

‘एकनाथ खडसे हे भाजपचे तीन दशके नेतृत्व करणारे नेते आहेत. त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांच्यावर पक्षात नेहमीच अन्याय होत आला. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे वृत्त आमच्यासाठी आनंददायी आहे. एकनाथ खडसे यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. अनेक आमदार खडसेंच्या संपर्कात आहेत. परंतु कोरोनाची परिस्थिती असल्याने निवडणूका घेणे परवडणार नाही. त्यामुळे हळूहळू त्यांना प्रवेश दिला जाईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत, ते नंतर येतील. परंतु खडसेंसोबत कोण येणार याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.’ असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close