Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाददेशविदेश

बिडकीन डिएमआयसीतील कामगारांना मध्यप्रदेशच्या मंत्री मीना सिंग यांनी भेट घेऊन दिला दिलासा

 पैठण / प्रतिनीधी औरंगाबाद जालना रेल्वेमार्गावरील सटाणा येथे घडलेल्या अपघातात मयत झालेल्या कामगारांना मदत करण्यासाठी राज्यात आलेल्या, मध्यप्रदेशच्या मंत्री मीना सिंग यांनी बिडकीन डीएमआयसी परप्रांतीय कामगारांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. व दोन दिवसात त्यांना त्यांच्या गावी परत जाण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
   गुरुवारी रात्री औरंगाबाद जालना रेल्वेमार्गावरील सटाणा गावाजवळ रेल्वेरुळावर झोपलेल्या सोळा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. हे सर्व कामगार मध्यप्रदेश चे असल्याने, या मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, त्यांच्या मंत्री मीना सिंग व कंट्रोल रूम चे मुख्य सचिव आई सी पी केशरी यांना मयत कामगारांच्या मदतीसाठी अपघातस्थळी पाठवले होते. मध्यप्रदेश च्या मंत्री मीना सिंग यांनी अपघातस्थळी भेट देऊन व अपघातात मयत झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांनाची भेट घेतली. व  दुपारी चारच्या दरम्यान मध्यप्रदेशच्या मंत्री बिडकीन डीएमआयसी मधील एल अँड टी कंपनीतील मध्यप्रदेश व अन्य राज्यातील कामगारांची भेट घेतली.
     डीएमआयसी मध्ये सध्या सहाशेच्या आसपास परप्रांतीय कामगार असून अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या या कामगारांनी मध्यप्रदेश च्या मंत्री मीना सिंग यांना त्वरित त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. यावेळी मंत्री मीना सिंग यांनी कामगारांना दिलासा देत दोन दिवसात त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आश्वासन दिले. रेल्वे अपघातामुळे यावेळी उपस्थित कामगार घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यावर मंत्री मीना सिंग यांनी अर्धा तास या कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी,जिल्हाधिकारी उदय चौधरी,ग्रामीण पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके,आयपिएस भामरे,तालुका आरोग्य अधिकारी डाँ.विजयकुमार वाघ यांच्यासह आदी विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close