Subscribe to our Newsletter
मराठवाडा

कोरोनाची धास्ती झुगारून भोकरदनचा आठवडी बाजार भरला

भोकरदन /सुरेश गिराम

भोकरदन : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने भोकरदन शहरात शनिवारी भरणार आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोरोनाची धास्ती न घेता शनिवारचा आठवडी बाजार नेहमीप्रमाणे भरला. कोरोना विषाणूची बाधा तसेच प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आढावा बैठकीत आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश संबंधित अधिका-यांना दिले होते. त्यानंतर नगर पालिकेच्या वतीने दोन दिवसापूर्वी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शनिवारी (दि.२७) रोजी थाटून आपला व्यवसाय केला. विशेष म्हणजे ग्राहक देखील नेहमी प्रमाणेच बाजारात खरेदी करण्यासाठी दाखल झाले होते. दर शनिवारी आठवडी बाजारात लाखो रूपयांची उलाढाल होते. तसेच शेकडो  छोट्या व्यावसायिकांची येथील उलाढालीतून उपजिका अवलंबून आहे. कदाचित याच कारणाने आणि मालाचा होणारे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाचे झुगारून आठवडी बाजार भरला

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close