Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

भोकरदन तालुकास्तरीय आमचं गाव आमचा विकास प्रशिक्षणाला उत्साहात सुरुवात


भोकरदन/सुरेश गिराम

/जिल्हा परिषद जालना राष्ट्रीय ग्राम अभियान अंतर्गत आमचं गाव आमचा विकास  आराखडा या प्रशिक्षणाचे दोन दिवशी आयोजन बुधवारी ता.९ रोजी भोकरदन येथील रत्नमाला लॉन्स येथे करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सरपंच,ग्रामसेवक व प्रशासक यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणात ग्रामपंचायत विकासाबाबत ग्रामपंचायतचा वार्षिक विकास आराखडा व प्रकल्प कसा बनवला जातो याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यामध्ये गावचा शाश्वत विकास म्हणजे काय?, त्याची ध्येये, आराखडा तयार करतांना एसडीजी चा व कलम ४५ सूची यांचा अंतर्भाव, जीपीडीपी चे स्त्रोत, विविध योजनांचे अभिसरण, आदर्श गाव संकल्पना व स्वरूप, जीपीडीपी बाबत शासन निर्णय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणात ग्रामपंचायतचा नमुना विकास आराखडा तयार करून सादरीकरण करून घेण्यात येणार आहे.याशिवाय तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी व पदाधिकारी यांचे देखील एक दिवसाचे प्रशिक्षण होणार आहे  यामध्ये तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची भूमिका व जबाबदाऱ्या, पंचायत समिती सदस्यांची जबाबदारी व भूमिका याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे.याशिवाय जिल्हा परिषद, राज्य शासनाकडून तसेच ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची माहिती देण्यात येणार आहे.प्रशिक्षणात प्रविण प्रशिक्षक म्हणून मच्छिंद्र पंडित व ज्ञानेश्वर जनकवार हे मार्गदर्शन करीत आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्या आदेशाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी  गजानन पाखरे, दौलत इंगळे, गजानन लहाने,  पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पं.स. चे अन्य कर्मचारी  परिश्रम घेत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close