Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गावकऱ्यांच्या एकजुटीने भांबर्डा ग्रामपंचायत चौथ्यादा बिनविरोध

करमाड :औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा ग्रामपंचायतचा चौथ्यादा बिनविरोध झाल्यानं पंचक्रोशीतील गावापुढे आदर्श निर्माण केला आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती विजेता पुरस्कारप्राप्त गाव, सन २०१५ शंभर टक्के वसुली पुरस्कार प्राप्त, आयएसओ नामांकन प्राप्त भांबर्डा ग्रामपंचायत एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीत रंगत वाढत आहे. समृद्धी महामार्गाच्या पट्ट्यात असणाऱ्या गावातील राजकारण धनदांडग्या शेतकऱ्यांमुळे यावेळेस रंगणार अशीच चर्चा सर्वत्र सुरू होती. दरम्यान भांबर्डा ग्रामपंचायतीची निवडणूक सात जागांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी सात जागांसाठी सात अर्ज दाखल करण्यात आल्याने निश्चित झाले. भांबर्डा गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुक काळात त्यात मतभेद, वाद-विवाद, सूडाची भावना, वाफट पैसा खर्च होणे आदी प्रकार होत असतो; परंतु ग्रामस्थांनी वेळीत एकत्र येत बिनविरोधचा निर्णय घेतला सर्व थोर आणि तरुणांनी एकत्र येत आदर्श निर्माण करण्याचा हा निर्णय घेतला यासाठी सर्व भांबर्डा ग्रामस्थांनीही प्रयत्न केले. बिनविरोध निवड ग्रामपंचायत सदस्यपदी संतोष भानुदास फुकटे,इंदूबाई भीमराव पठाडे, शिलाबाई राजेंद्र काळे, संगीता विजय काकडे, श्रीराम भवर, सुमनबाई शिवाजी दिवटे, सर्जेराव तेजराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने तसेच सर्व पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close