Bhagwat Karad
लायन्सच्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच: भागवत कराड
– लायन्स क्लबचे बहुप्रांतीय अधिवेशनाचा समारोप
– चार प्रांतातून ६०० पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती
– ३०० हून अधिक सदस्यांच्या कार्याचा गौरव
औरंगाबाद: महाराष्ट्रातील चार प्रांताच्या माध्यमातून ९०० हून अधिक क्लब आणि हजारो पदाधिकारी आणि सदस्यांच्या माध्यमातून प्रत्येक शहर, तालुका आणि गावामध्ये मोठे सेवाकार्य उभारण्यात आले आहे. लायन्स क्लब मार्फत होत असेलल्या सामाजिक कार्याचे करावे तितके कौतुक कमीच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले. ते लायन्स क्लबतर्फे हॉटेल प्रेसिडेंट बँन्क्वेट येथे आयोजित बहुप्रांतीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी रविवारी (ता. ८) बोलत होते. यावेळी त्यांचा लायन्स क्लबच्यावतीने सन्मानपत्र, पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. चारही प्रांताच्या प्रथम उपप्रांतपालांनी येणाऱ्या नवीन वर्षाचे बहु प्रांतपाल यांची निवड केली. तसेच या अधिवेशनात बहु प्रांताची घटनेची सुधारित पुनर्रचना करण्यात आली.
यावेळी माजी आंतरराष्ट्रीय संचालक संजय खेतान, डॉ. नवल मालू, नरेंद भंडारी, जयेश ठक्कर, अभय शास्त्री, संदीप खंडेलवाल, दिलीप मोदी, सुनील सुतार, पुरुषोत्तम जयपुरिया, राजेंद्र सिंग बग्गा, हेमंत नाईक, श्रावण कुमार के, गिरीश सिसोदिया, तनसुख झांबड, राजेश राऊत, महावीर पाटणी, एच. एन. जैन, सुनील व्होरा, वासुदेव कला गटगे, जगदीश पुरोहित, विनोद वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख वक्ते तथा मोटिव्हेशनल स्पीकर अतुल ठाकूर म्हणाले कि, आज प्रत्येक व्यक्तीने वित्तीय व्यवस्थापन करणे ही काळाची गरज आहे. फक्त पैशांच्या मागे लागून वेळ वाया घालू नका. त्याऐवजी आर्थिक नियोजक करा. प्रामुख्याने वायफळ खर्च करू नका, त्याने कोणाचेही भले होणार नाही. तुमच्याप्रती समाजाने आदर्श व्यक्ती म्हणून बघावे, असे कार्य करा. यावेळी स्टँड अप कॉमेडीयन सुनील सावरा उपस्थितांना सामाजिक, राजकीय, विनोदाने सगळ्यांना खळखळून हसण्यास भाग पडले.
–
उत्कृष्ट कार्याचा गौरव
बहुप्रांतीय अधिवेशनात चारही प्रांतातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैयक्तिक, क्लब आणि प्रांतीय अधिकारी स्तरावरील व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर ग्लोबल अक्शन टीम पदकाने राहुल औसेकर आणि योगेश जैस्वाल यांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर यानिमित्ताने घेण्यात आलेल्या इनडोअर स्पर्धेतील विजेते १५ महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात आला.
बहुप्रांतीय अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून सीए विवेक अभ्यंकर, संयोजक तनसुख झांबड, सहसंयोजक राजेश राऊत, कोषाध्यक्ष राजेश भारुका यांनी या परिषदेचे उत्तमरित्या आयोजन केले. क्रीडा स्पर्धांसाठी नितीन पेडगावकर, संजय गुजराती, मोरेश्वर कुलकर्णी, आनंद देसाई, मथुरादास देशमुख, सतीश देशपांडे, सलीम कुडचीवाला, अजय गोजमगुंडे, उषा देशपांडे, अंगद नवटक्के, प्रमिला नवटक्के, रुझीना कुडचीवाला, डॉ. प्रदीप गर्गे, शेखर देसरडा, सुनील ठोले यांनी पुढाकार घेतला. परिषदेसाठी जितेंद्र महाजन, मंदार दाते, संजीव गुप्ता, रमेश पोकर्णा, मिलींद दामोदरे, अतुल लड्डा, राजेश शुक्ला, जयदीप घुगे, प्रसाद पाटणी, दयाल डिडोरे, विशाल झंवर, राजेंद्र रखवाल, अरूण मित्तल यांनी पुढाकार घेतला.
–