Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेटमराठवाडा

बाहेरजिल्हयातून आलेल्या व्यक्तींपासून सतर्क राहून काळजी घ्या

माजलगांव / रविकांत उघडे

: कोरोना विषाणू ( कोविड -19 ) पासून बचाव करण्यासाठी मागील दोन महिन्यांच्या कालावधीपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माजलगांव उपविभागातील नागरिक लॉकडाऊनचे नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत . याचीच फलनिष्पत्ती म्हणून काल – परवा पर्यंत माजलगांव उपविभागामध्ये बाधित रुग्ण सापडलेला नव्हता . परजिल्हयात अडकलेल्या मजूर , यात्रेकरू , यांचेसह ईतर नागरिक यांच्या सोयीसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणीसह काही अटींवर आपल्या जिल्हयामध्ये स्वत : चे गावी येण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे . असे असतानाही विनापरवानगी तसेच गुप्या मार्गाने बाहेरजिल्हा , बाहेरगावाहून स्वत : च्या मुळ गावी परत येऊन लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करत आहेत . तसेच काही नागरीक त्यांना याकामी सहकार्य करत आहेत . परंतु असे केल्यामुळे संपुर्ण कुटूंब तसेच सदर गावाचे आरोग्य धोक्यामध्ये पडते . कारण माजलगांव उपविभागातील हिवरा , कवडगांवथडी या गावामध्ये आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांवरुन याचीच प्रचिती येते , ज्यामुळे सदर गांव व परिसरातील अनेक गावांमध्ये याचा संसर्ग होण्याचा गंभिर धोका निर्माण झाला . त्यामुळे अशा बाबींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनासोबतच माजलगांव उपविभागातील माजलगांव , धारूर , वडवणी या तिन्ही तालुक्यातील ग्राम दक्षता समित्यांनी अत्यंत दक्ष राहणे गरजेचे आहे

. बाधित भागातून । तसेच परजिल्हयातून विनापरवानगी आलेले तसेच परवानगी घेऊन आलेले मात्र वारंटाईन नियमांचा भंग करुन गावात , शहरात इतर फिरणारे इसमांबाबत नागरिकांनी तत्काळ प्रशासनास , ग्राम दक्षता समिती , ग्राम सुरक्षा दल , ग्रामसेवक , तलाठी , मंडळ अधिकारी , सरपंच , पोलिस पाटील , आरोग्य कर्मचारी , आशा स्वयंसेविका यांना देण्याचे आवाहन श्रीमती शोभा ठाकूर , उपविभागीय अधिकारी माजलगांव यांनी केले आहे . तसेच ग्राम दक्षता समिती व ग्राम सुरक्षा दल यांनी गावात राहून कोण कोण व्यक्ती गावात आलेल्या आहेत याबाबत सतर्क रहावे . तसेच गांव पातळीवर स्थानिक लोकांनी आपल्या गावात पुणे – मुंबई येथिल लोकांना घरामध्ये थेट प्रवेश न देता त्यांना वारंटाईन करणेसाठी आशा स्वयंसेविका , अंगणवाडी सेविका , ग्रामसेवक यांना त्वरित कळवावे . सध्या माजलगांव उपविभागामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता , प्रशासन अत्यंत कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे . मात्र नागरिकांनी घाबरुन न जाता दक्ष रहावे . तसेच संयम ठेवावा , अतितातडीच्या कामाव्यतिरीक्त घराबाहेर पडू नये . आपले हात वारंवार सावणाने / हँडवॉशने स्वच्छ धुवा . आपला हात वारंवार नाक , तोंड यांना लागणार नाही याची काळजी घ्या . खोकला अथवा शिंकताना तोंडावर रुमाल धरा . खोकला किंवा सर्दी झालेल्या व्यक्तींपासून दूर रहा . व्यक्तींशी हातमिळवणी टाळा , सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर धुंकू नका . पुर्ण शिजवलेले अन्न , फळभाज्या खाव्यात . आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांपासून दूर रहा . सर्दी , खोकला , ताप , श्वसनाचा त्रास बरा होत नसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा व उपचार करुन घ्या . चुकीचे संदेश पसरवू नका . चुकीचे संदेश मिडीयावर प्रसारित केल्यास अथवा परजिल्हयातून आलेल्या व्यक्तींची माहिती लपविल्यास वा अशा आलेल्या व्यक्तींचा सहकार्य केल्यास आपल्याविरुद्ध कायदेशिर कार्यवाही होऊ शकते . याची सर्वांनी नोंद घेण्याचा इशाराही श्रीमती शोभा ठाकूर यांनी नागरिकांना दिला आहे .

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close