Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

बजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार

·         चेतक www.chetak.com वर ऑनलाईन 2000 रुपयांत बुक करता येईल.

·         औरंगाबाद येथील चेतक विक्रेत्यांकडे डिस्प्ले आणि टेस्ट-राईडची सुविधा उपलब्ध

औरंगाबाद, 20 जुलै 2021: बजाज ऑटो, या जगातील सर्वात मौल्यवान टू-व्हीलर कंपनीने औरंगाबाद येथे 22 जुलै, सकाळी 9 वाजल्यापासून चेतक इलेक्ट्रीक स्कूटरची बुकिंग सुरू करणार. ग्राहकांना बुकिंग करताना एक सोईस्कर व सुरळीत अनुभव घेता यावा ह्या उद्देशाने www.chetak.com वर केवळ रु. 2000/- भरून वाहनाची बुकिंग करता येईल. या अगोदर पुणे आणि बेंगळूरू येथील बुकिंग स्लॉट 48 तासांहून कमी कालावधीत पूर्ण बुक झाला होता आणि औरंगाबाद येथे देखील असेच होण्याची आशा आहे.  

चेतक इलेक्ट्रीक स्कूटरची निर्मिती हरित आणि स्वच्छ भविष्याकरिता झाली असून, किमान मेंटेनन्स सर्विस इंटरर्व्हलची आवश्यकता 12,000 किमी किंवा एक वर्ष (जे अगोदर होईल ते) झाल्यावर लागेल. या वाहनाची बॅटरी वॉरंटी 3 वर्षे किंवा 50,000 किमी (जे अगोदर होईल ते) याप्रमाणे असेल.

चेतक इलेक्ट्रीक स्कूटरच्या प्रीमियम आणि अर्बेन अशा दोन व्हेरीयंट उपलब्ध आहेत . प्रीमियम व्हेरीयंट हा इंडिगो मेटॅलिक, वेल्यूत्तो रोस्सो, ब्रुकलीन ब्लॅक आणि हेझलनट अशा चार लक्षवेधी रंगांत उपलब्ध आहे. तर अर्बेन व्हेरीयंट सायबर व्हाईट आणि सिट्रस रश अशा दोन रंगांत उपलब्ध आहे. चेतक ईव्ही [email protected] औरंगाबाद येथे विक्रेत्यांकडे रु. 1,42,988 च्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध असेल.

या प्रसंगी बोलताना कार्यकारी संचालक राकेश शर्मा म्हणाले की, “आम्हाला बेंगळूरू आणि पुणे येथे भरभरून प्रतिसाद लाभला होता. औरंगाबादमध्ये चेतकची विक्री सुरु करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आणि इतर शहरातही लवकरच पदार्पण करणार आहोत. औरंगाबाद शहरातून आम्हाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची आशा आहे.  चेतक हि ‘हमारा कल ’ ह्या संकल्पनेची जाण करून देते – एक उत्साही आणि जबाबदार भविष्याची जाण. बुकिंग झालेलया चेतकची पहिली शिपमेंट ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून सुरू करण्यात येईल.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close