Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

बदनापूर : धावत्या ट्रॅव्हल्सला आग, गाडी जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही


बदनापूर : औरंगाबादहून जालन्याला जाणाऱ्या धावत्या ट्रॅव्हल्सला शनिवारी मध्यरात्री १२ वाजता अचानक आग लागली. बसमध्ये चालक व वाहक वगळता कोणताही प्रवाशी नव्हता. आग लागल्याचे समजताच चालक आणि क्लिनर यांनी प्रसंगावधान राखून बस थांबवत त्यातून उडी मारली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण आग लागल्याने बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना जालना–औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर तालुक्यातील वरुडी पाटी जवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनूसार, औरंगाबाद येथून जालन्याला प्रवाशी घेऊन जाणारी रिकामी साईरथ ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच 24 –9954)वरुडी शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ पोहोचताच बसला अचानक आग लागली. बसला आग लागल्याचे चालक संजय क्षीरसागर समजताच त्यांनी मोठ्या शिताफीने बस रस्त्याच्या कडेला थांबवत क्लिनर गणेश विठ्ठल मचे यांच्यासह बसमधून उडी घेतली. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय बसला लागलेली आग विझविण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून पाण्याचे टँकर मागविले. तसेच जालन्याहून अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीच्या घटनेत पेटलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close