Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कराबाबत बबनदादा आक्रमक


स्व.दि.बा.पाटील स्था.प्र.शे.सं. समितीच्या पदाधिकाऱ्यांसह घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 


पनवेल :पनवेल महानगरपालिकेने लादलेल्या जाचक मालमत्ता कर प्रणाली विरुद्ध शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार तसेच स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आवाज उचलला आहे. यावेळी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन यावर निर्णय घेण्यास भाग पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
मुंबई, ठाणे येथे ५०० फुटापर्यंतच्या घराना मालमत्ता कर माफी असताना पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मात्र नागरिकांवर अन्यायकारक कर लादला जात आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लादला गेलेला मालमत्ता कर हा रद्द करण्यात यावा अशी मागणी समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी समोर आणली आहे. याबाबत ज्या पद्धतीने मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये ५०० फुटांपर्यंत कराबाबत माफी देण्यात आली आहे त्या पद्धतीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनाही या करामध्ये माफी मिळावी यासाठी स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून यावर निर्णायक तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलताना दिला. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close