Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

बाबा” लघुपट १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला ; एम जी एम विद्यापीठात “प्रीमियर शो”

बाबा” लघुपट १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला एम जी एम विद्यापीठात “प्रीमियर शो”

औरंगाबाद |औरंगाबाद शहरातील आदर्श प्रोडक्शन एम एच २० च्या वतीने स्री भ्रूण हत्येंवर आधारीत शेतकरी बापाचे कथानक असलेल्या “बाबा” या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून या लघुचित्रपटाचे ट्रेलर यु ट्यूब वर  प्रदर्शित करण्यात आले आहे. या लघुचित्रपटास नेटीझन्स चा उदंड प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने चित्रपटाची लिंक लाईक आणि शेअर केल्या जात आहे. मंगळवारी (दि.१२) या लघुचित्रपटाचा प्रीमियर शो विशेष निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून एमजीएम युनिवर्सिटी च्या स्कूल ऑफ फिल्म आर्ट विभागातील चित्रपट महर्षी व्ही. शांताराम चित्रपटगृहात सकाळी १२.१२ मिनिटांनी प्रदर्शित होईल, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शक सचिन ठोकळ व मिडिया प्रमुख सचिन अंभोरे यांनी दिली.

आयुष्यात आई नंतर आपले वडील किती महत्वाचे असतात हे सांगणाऱ्या शेतकरी बापाची कहाणी या लघुचित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. वडील आणि मुलगी यांच्या अतूट नात्याची कहाणी लेखक नंदकिशोर सूर्यवंशी यांनी आपल्या लेखणीतून उतरवली आहे. तर दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी तेवढ्याच ताकदीने या कथानकाला दिग्दर्शित करून प्रेक्षकांना सिनेमागृहात शेवट पर्यंत खिळवून ठेवण्याची किमया केली आहे. तर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता आकाश ठोकळ याने आपल्या अभिनयातून तरुणाईची मने जिंकली आहेत. अभिनेत्री साक्षी राठोड हिने चित्रपटात शेतकऱ्याच्या मुलीची भूमिका साकारली असून वडील आणि मुलीचे भावनिक नाते तिने आपल्या अभिनयातून उलगडले आहे. खलनायक सावकाराच्या भूमिकेत सचिन ठोकळ यांनी आपला रुबाब दाखवून ग्रामीण भागातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वेळप्रसंगी कठोर होत आपली आक्रमकता रंगवली आहे. तर शेतकऱ्याचे मित्र असलेली भूमिका सचिन अंभोरे यांनी रंगवून सावकारी पाशात अडकनाऱ्या आपल्या शेतकरी मित्राला सावरण्याचे काम चित्रपटात केले आहे. शेतकरी मित्राला प्रत्येक अडचणीत निस्वार्थ मदत करणारा एक सच्चा मित्र त्यांनी रंगवला आहे. या चित्रपटात मनोज पगारे, मानसी शेवाळे, सुनिता शेवाळे, ज्ञानेश्वर तुपे, अमोल मगरे, रोहित मोतीचूर, सुनील सदावर्ते, अमोल जोगदंडे, आदित्य सोनवणे, गणेश भालेराव, मास्टर सिद्धी, आरोही आदींच्या भूमिका आहेत.

या लघुचित्रपटाची तांत्रिक व चित्रीकरणाची बाजू प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अभिजित गाडेकर यांनी सांभाळली असून चित्रपटाला अनिकेत गाडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. तर कलरीस्ट श्रीकृष्ण खेकाळे  यांनी केली आहे. या चित्रपटाचे प्रोमोशन आणि पब्लिसिटी  सचिन मल्टीमिडिया यांनी केली. तर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क याचे माध्यम प्रायोजक आहेत. आदर्श एम एच २० प्रोडक्शनने विविध चित्रपटाची निर्मिती करून जगभरात होणाऱ्या विविध राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदविला असून भविष्यातील विविध चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी अनेक प्रकल्प हाती घेणार असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितेले. बाबा या लघुचित्रपटात प्रत्येकाचे पात्र जरी वेग-वेगळे असले तरी ती प्रेक्षकांना भावतील हा माझा विश्वास आहे. असे दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी  व्यक्त केले आहे. प्रत्येकाने हा चित्रपट नक्की आपल्या कुटुंबासह आवर्जून पाहावा असे आव्हान त्यांनी केले आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close