Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कोरोना विरुद्ध लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे – अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे



औरंगाबाद कोरोना विरुद्ध लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि या लढाईत लोक कलापथकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे जनजागृती महत्वाची ठरणार आहे असे प्रतिपादन अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) च्या वतीने आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृती चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र व गोवा प्रदेश) च्या वतीने महाराष्ट्र व गोवा राज्यात
आत्मनिर्भरभारत, COVID-19 लसीकरण जनजागृतीपर 16 चित्ररथ आणि त्या चित्ररथावर नोंदणीकृत सांस्कृतिक लोक कलापथकांच्या सादरीकरणाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एका चित्ररथाचे उद्घाटन आज दिनांक 15 फेब्रुवारी 2021 (सोमवार) रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय आवारात अपरजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी केले. औरंगाबाद जिल्ह्यात 15 ते 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत 10 दिवस हे चित्ररथ फिरणार आहे.
पुढे ते म्हणाले कोरोना विरुद्धच्या लढाईत केंद्र शासनाने COVID-19 लसीकरण व आत्मनिर्भरभारत वर लोक कलेच्या माध्यमातून जनजागृती हा एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे. सांस्कृतिक कलापथकं गीत व पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करतात.
आत्मनिर्भरभारत आणि COVID-19 लसीकरणाचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने या जनजागृती
महाभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे पंजिकृत सांस्कृतिक लोक कलापथकांचे गट शासन व तळागाळातील शेवटच्या स्तरावरील लोकांकरीता महत्वाचा दुवा आहेत कारण ते मनोरंजन माध्यमातून
योग्य माहिती प्रसारित करतात आणि जागरूकता निर्माण करतात.
यावेळी नोंदणीकृत सांस्कृतिक कलापथक, आभा कला मंच सोबतच क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबाद चे
सहा. संचालक निखिल देशमुख, प्रबंधक संतोष देशमुख आदि उपस्थित होते.
औरंगाबाद मध्ये ह्या जनजागृती चित्ररथावर लोक कलापथकांच्या सादरीकरणासाठी नोंदणीकृत आभा कला मंच व मीरा उमप अँड पार्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ह्या चित्ररथ जनजागृतीच्या यशस्‍वितेकरिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, औरंगाबादचे सहा. क्षेत्रीय प्रचार
अधिकारी, प्रदीप पवार, सहकारी राहुल मोहोड, प्रभात कुमार आदीनी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close