Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

न्याय मागण्यासाठी जिल्हाधिका-यांना निवेदन देणाऱ्या शेतकऱ्यांला ठेकेदाराकडून आवेरीची भाषा

mh20live Network

करमाड /सुदाम पठाडे
औरंगाबाद तालुक्यातील ठिकाणी मोठ्या प्रमाणात समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे. कोठेवधी रूपये खर्च करूण शासन रस्ता बनवत आहे. लाँकडाऊनच्या काळात पण महाराष्ट्र बंद. होता पण या रत्याचे काम बंद नव्हते, भांबर्डा (ता.औरंगाबाद) येथे जुना नाला बंद करून नवीन नाला समृद्धी महामार्गावर तयार करण्यात आला आहे. पूर्वी ज्या नाल्याने पाणी जात होते त्या दिशेने न घालता भांबर्डा येथील संतोष गिरजुबा दिवटे या शेतकऱ्यांच्या डाळींब बागेकडे वळविण्यात आला आहे. याच ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतात सहा महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने बागेचे लाखो रूपयाच्या पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतरच्या संबंधित विभागाने फक्त पंचनामे करून गेले तर सहा महिने झाले तरी फिरकले नाहीत. या ठिकाणी केला जात असलेल्या नवीन पुला बाबत माहिती मिळवून न्याय मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे विनंती केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी संबंधित पुलाचे ठेकेदार नरसिंह कुंडी आणि सेवा निवृत्त मंडळ अधिकारी अंबादास घागरे गुरुवार दि.३ डिसेंबर रोजी आले होते. सदर चर्चा करत असतांना ठेकेदाराकडून शेतकऱ्यांना हातवारे करत आवेरीची भाषा वापरून अपमान केला तसेच धमकाव्याचे प्रकार घडला असताना सेवा निवृत्त अधिकारी अंबादास घागरे यांनी ठेकेदार नरसिंह कुंडी याला समजून सांगितले. तसेच सदर शेतकऱ्यांची तक्रार समजून घेत वरिष्ठांना कळवितो असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनीही जोपर्यंत नुकसान भरपाई व पुला बाबत योग्य सल्ला व माहिती लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत पुलाचे काम बंद राहून द्यावे असे सांगितले. त्यावर ठेकेदाराने होकार देत सदर ठिकाणाहून पळ काढला होता. यावेळी शेतकरी संतोष दिवटे, भिकाजी नजन, मच्छिंद्र दिवटे, रामेश्वर पठाडे, पांडुरंग नजन, बाबासाहेब दिवटे,सारंगधर दिवटे, सरपंच भीमराव साळुंके, सुनील दिवटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close