औरंगाबाद जिल्ह्यात कलम 144 लागू
mh20live Network
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हयामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
या आदेशान्वये 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीची प्रक्रिया औरंगाबाद जिल्ह्यात ज्या ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे त्या ठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष/ कार्यालय उमेदवाराचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन,पेजर वायरलेस सेट,ध्वनिक्षेपक व सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन संबंधित पक्षाचे/उमेदवाराचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
हा आदेश निवडणुकीचे कामे हाताळताना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मतदान केंद्राच्या ठिकाणी 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील तसेच प्रत्येक व्यक्तींवर हे आदेश तामिल करणे शक्य नसल्यामुळे हे एकतर्फी आदेश ध्वनिक्षेपक ध्वनिक्षेपकावरून पोलिसांनी जाहीर करून त्यास प्रसिद्धी देण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.