Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

औरंगाबाद, कोल्हापूर ते कल्याण-डोंबिवली, फेब्रुवारीत 5 महापालिकांच्या निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता?

मुंबई: कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेल्या राज्यातील पाच बड्या महानगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात पार पडण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे. याशिवाय, राज्यातील 96 नगरपालिकांसाठीही फेब्रुवारी महिन्याच्या आसपास निवडणुका पार पडतील. त्यामुळे राज्यात फेब्रुवारी महिन्यात राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळू शकते.
नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने भाजपला धूळ चारली होती. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीसाठी राज्यभरात अनुकूल वातावरण असल्याची चिन्हं दिसत आहेत. परिणामी महाविकासआघाडीने याचाच फायदा घेत फेब्रुवारी महिन्यात बड्या महानगरपालिकांच्या निवडणुका उरकण्याचे ठरवले असावे, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निकालही लागला. त्यामुळे आता राज्यातील निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

महाविकासआघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर महापालिका निवडणुकांबाबत ही उत्सूकता आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडी मधील पक्ष एकत्र लढणार का याकडे लक्ष लागलं आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close