Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या निकालास होणार उशीर,रात्री 8 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल

औरंगाबात : औरंगाबाद पदवीधर निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 35 उमेदवार आहेत. यापैकी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या उमेदवारात ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. औरंगाबाद येथील कलाग्राम मैदानात या निडवडणुकीच्या मतमोजणीचे काम सुरू आहे. दुपारी 2 वाजेनंतर पहिल्या फेरीतील मत मोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे, पहिल्या फेरीतील निकाल हाती येण्यास उशीर होणार आहे.
कलाग्राम मतमोजणी केंद्रावर सध्या टेबलवर गठ्ठे लावण्याचेच काम सुरू आहे. एकूण 56 टेबल लावण्यात आले आहे. एकूण 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी करण्यात येत आहे. त्यात 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे. एकुण पाच फेऱ्यात ही मत मोजणी होणार आहे. एका फेरीत 56 हजार मतांची मोजणी होणार आहे. दुपारी दोन वाजेनंतर पहिल्या फेरीतील मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कुणाचाच विजय झाला नाही तर दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार आहेत. दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागली, तर निकाल हाती येण्यास उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली तर पहिला कल दुपारी 4 वाजता हाती येईल. तर रात्री 8 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल.अंतिम निकाल हाती येण्यास रात्री उशीर होऊ शकतो.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close