Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

औरंगाबाद जिल्हा क्रॉसकंट्री स्पर्धेचे २९ जानेवारीला विद्यापीठ येथे आयोजन


 औरंगाबाद जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन व राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेच्या निवड चाचणीचे आयोजन दिनांक २९ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डन येथे संपन्न होणार आहेत.
या स्पर्धेमध्ये खुला गट पुरुष दहा किलोमीटर, खुला गट महिला दहा किलोमीटर, वीस वर्षाच्या आतील गट मुले आठ किलोमीटर, वीस वर्षाच्या आतील गट मुली सहा किलोमीटर, अठरा वर्षाच्या आतील गट मुले सहा किलोमीटर, अठरा वर्षाच्या आतील गट मुली चार किलोमीटर, सोळा वर्षाच्या आतील गट मुले दोन किलोमीटर, सोळा वर्षाच्या आतील गट मुली दोन किलोमीटर असे स्पर्धेचे गट आहेत. या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी किमान कामगिरी प्राप्त करणाऱ्या खेळाडूची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेदरम्यान केंद्र आणि कोविदसाठी चे मार्गदर्शक तत्व आणि सूचनांनुसार स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या संबंधीची काळजी जिल्हा असोसिएशन घेणार आहे. यासाठी खेळाडू त्यांचे प्रशिक्षक पालक यांनी सर्व प्रकारचे शासनाची एसओपी चे नियम पाळून सहकार्य करावे व अधिक माहितीसाठी अॅथलेटिक्स कोच अनिल निळे ८००७६४८१४७ यांच्याशी संपर्क साधावे तसेच स्पर्धेसाठीसाठी येताना मूळ जन्मदाखला, फोटो, आधार कार्ड, दहावीची सनद सोबत आणावी असे आवाहन औरंगाबाद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी व सचिव फुलचंद सलामपुरे यांनी केले आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close