Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादकोरोंना अपडेट

औरंगाबादेत कोरोना@ 900 आणखी 28 रुग्णांची वाढ

औरंगाबाद/mh20live

शहरात आज सकाळी 30 रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यात दुपारी आणखी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 900 झाली आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आता आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश असल्याचेही त्यांनी कळविले आहे.
——-
आज सकाळी 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
औरंगाबाद शहरातील आज सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, घाटी रुग्णालयात मागील चोवीस तासात औरंगाबाद शहरातील नवीन हनुमान नगर येथील 74 वर्षीय, बायजीपुरा येथील 70 वर्षीय, शहानूर मियाँ येथील 57 वर्षीय आणि हिमायत नगर येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. आतापर्यंत 25 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close