Subscribe to our Newsletter
क्राईम

औरंगाबाद:सिडको बस स्टँडजवळ भीषण अपघात, बसची सिग्नलवर उभ्या दुचाकीला जोरदार धडक, एक तरुण जागीच ठार एक गंभीर जखमी


औरंगाबाद: औरंगाबादकडून जालन्याला निघालेल्या भरधाव एसटी बसने सिडको चौकातील सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याची घटना आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीचालक शुभम शिंदे यात गंभीर जखमी झाला आहे. तर मयताची अद्याप माहिती मिळाली नाही. अपघातात एसटी बसमधील १० ते १२ प्रवासी देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यापैकी एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ही बस औरंगाबादकडून जालन्याला जात होती. बस सिडको चौकातील सिग्नल येथे आली असता चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी पाठीमागून दुचाकीला धडकली. ट्राफिकमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीच्या समोरूनही एक बस उभी होती त्यामुळे दोन्ही बसच्यामध्ये चेंगरून हा अपघात झाला आहे. जखमींना बसमधून बाहेर काढून रूग्णालयात हलवलं आहे. दुचाकीस्वार दोघेही बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

रुग्णवाहिका लवकर आलीच नाही

रुग्णवाहिका न आल्याने ऑटोतून नेले घाटीत, नागरिक संतप्त अपघात एवढा भीषण होता की, एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सिग्नलवर उभ्या असलेल्या दुचाकीला उडवल्यानंतर उपस्थित नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी बसच्या काचा फोडल्या. दरम्यान घटनास्थळी लवकर रुग्णवाहिका न आल्याने दोघांनाही ऑटो रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close