Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुणे – कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांनी औंध परिसरात एकाला मारहाण करून हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद या गुन्ह्यात करण्यात आली आहे.

अमन अजय चड्डा यांच्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल केला आहे. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणूनही त्यांची ओळख आहे. सध्या ते मनसेमध्ये आहेत.

तक्रारदार अजय चड्डा यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरुन औंधवरुन संघवी नगरकडे निघाले होते. त्यावेळी जाधव यांनी आपल्या चारचाकीचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे अपघात झाला. त्यावरुन चड्डा यांच्या वडिलांनी जाधव यांना जाब विचारला. त्यावेळी आरोपींनी चड्डा यांच्या आई आणि वडिल्यांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. आपले हृदयाचे ऑपरेशन झाल्याचे चड्डा यांच्या वडिलांनी सांगितल्यानंतर देखील हर्षवर्धन जाधव यांनी मारहाण सुरुच ठेवली, असा आरोप अमन चड्डा यांनी केला आहे. त्यानंतर अजय चड्डा यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. मात्र, अद्याप हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close