Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

स्वाभिमानी’ च्या जिल्हाध्यक्ष यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न


         विशाल जाधव/सिल्लोड
            अवैध गौण खनिज उत्खनन करणे, क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे, रात्रीची गौण खनिज वाहतूक करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती वराडे यांच्या अंगावर सिल्लोड येथून घरी येत असताना संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान हायवा घालून जीवे मारण्याचा प्रयत्न काल दि. 22 ऑक्टोबर रोजी करण्यात आला.            जळगाव – औरंगाबाद महामार्गासाठी सारोळा येथील खडी केंद्रातून गौण खनिजाचा पुरवठा होतो. मात्र हा पुरवठा करतांना नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त लोडने वाहतूक करण्यात आल्याने सारोळा लिहाखेडी रस्त्याचे तीनतेरा वाजले त्यामुळे अत्यावश्यक सेवा सुद्धा गावात पोहचण्यास अडचणी निर्माण होत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विरोधात आवाज उठवला व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन कार्यालय, पोलीस स्टेशन येथे क्षमतेपेक्षा जास्त लोड ने गौण खनिजांची वाहतूक करणे, रात्रीची गौण खनिज वाहतूक करणे, परवानगी न घेता गौण खनिज उत्खनन करणे जळगाव औरंगाबाद महामार्गाच्या व्यतिरिक्त इतरत्र पुरवठा करण्यासह अनेक तक्रारी आर. एस. कामठे व खडी केंद्र चालकाविरोधात  विविध विभागात केल्या. त्यामुळेच हा घातपात घडवण्याचा प्रकार सदर खडी क्रेशर चालकाने केला असल्याचा आरोप स्वाभिमानी ने करत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार स्वाभिमानी ने अजिंठा पोलीस स्टेशन ला केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close