Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा घात; कायदेशीर लढाई लढणार : विनोद पाटील

MH20LIVE NETWORK

औरंगाबाद : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरू करण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे नेते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला. सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे विनोद पाटील यांनी म्हणाले. ठाकरे सरकारने मराठा विद्यार्थ्यांचा घात केला आहे. मराठा समाजासोबत राज्य सरकारचे वर्तन दोषपूर्ण आहे. विशेष बाब म्हणून जागाही वाढवल्या नाहीत. ‘फी’मध्ये देखील सवलत दिली नाही. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असल्याचे विनोद पाटील म्हणाले. राज्य सरकारने लाखो मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केले. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या विरोधात असल्यासारखे वागते. सर्वोच्च न्यायालयातही राज्य सरकारची चालढकल सुरू आहे. आता सरकारच्या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे विनोद पाटील म्हणाले. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश एसईबीसी वर्गासाठी आरक्षित न ठेवता करण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आलेले नाहीत, अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. हे प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असतील, असे शासन आदेशात ठाकरे सरकारने सांगितले.

सरकारने दिलेल्या आदेशावर विनोद पाटील यांनी आक्षेप नोंदवले आहेत. सरकारच्या आदेशाने लाखो मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताय, अशी टीका विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर केली. दुसरीकडे, सर्वोच्‍च न्‍यायालयाने एसईबीसी प्रवर्गासाठी शैक्षणिक प्रवेशासाठीच्या 12 टक्के आरक्षणाला स्‍थगिती दिलेली आहे. या स्‍थगिती आदेशाच्‍या पार्श्‍वभूमीवर एसईबीसी प्रवर्गातील मुलांच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील प्रवेशासाठी अधिसंख्य जागा निर्माण करून उपाययोजना करण्‍यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. त्यानुसार जागा तयार कराव्यात, असे खासदार संभाजीजेंनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close