Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अमरापूर वाघूंडी येथे अज्ञात रोगाने १३५ कोंबड्या दगावल्या


पैठण / किरण काळे     

   जायकवाडी धरणाच्या बँकवाटर क्षेत्रात असलेल्या अमरापुर वाघुंडी (ता.पैठण) येथिल शेतकऱ्यांच्या शेतात जोडधंदा म्हणून पाळलेल्या गावरान जातीच्या १३५ कोंबड्या अज्ञात रोगाने दगावल्याने परिसरात खळबळ उडाली.याबाबत संबंधित शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांनी सांगीतले की,सदृढ वाटणाऱ्या कोंबड्याच्या डोक्यावरिल तुरा एकाएकी काळा पडून क्षणार्धात मरुन पडल्या.मागील तीन दिवसात पहिल्या दिवशी आठरा,दुसऱ्यां दिवशी १०२,तर तिसऱ्या दिवशी १५ अशा एकुन १३५ कोंबड्यांचा आचानक मृत्यू झाला असुन जवळजवळ अंदाजे पस्तीस ते चाळिस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
    अमरापूरवाघूंडी हे गाव जायकवाडी  धरणकाठावर असुन देश परदेशातील पक्षी हिवाळ्यात येत असतात. शेतातील खुल्या जागेत फिरणार्या कोंबड्यांचा  आचानक मृत्यू पडत असल्यामूळे  पशुपालक शेतकरी गोंधळून गेला आहे.सदर घटनेची बातमी समाज माध्यमातून वार्या सारखी पसरली असता. शासकीय पशु वैद्यकीय कर्मचारी यांनी शनिवारी दुपारी भेट देऊन नुकसानगृस्त शेतकऱ्यांला योग्य ती खबरदारी घेण्याचे मार्गदर्शन केले.  काही मृत कोंबड्या पुणे येथिल प्रयोगशाळेत तपासनी अहवालासाठी घेऊन गेले असुन त्या अहवालाच्या अधारेच नेमका काय प्रकार आहे हे उघड होणार असल्याचे पशू वैद्यकीय अधिकारी यांनी सांगीतले.त्याच बरोबर एक मृत कावळा देखील पथकाला सापडला.    अद्याप मृत झालेल्या पक्षांचा कोणताच वैद्यकीय अहवाल शेतकऱ्यांला प्राप्त झाला नसुन परिसरासह तालुक्यात जोडधंदा म्हणून कोंबड्या पाळणारे काळजीत पडले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close