Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

अॅस्टर वायनाडच्या वतीने भारताचे पहिले पोस्ट-रेज्युवेनेशन सेंटर लॉन्च

मुंबई  : कोविड-19 रोगमुक्त झालेल्या रुग्णांना शारीरिक तसेच मानसिक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो आहे. अशाच रुग्णांच्या समस्यांकरिता अॅस्टर वायनाडच्या वतीने देशातील पहिले पोस्ट-कोविड रेज्युवेनेशन सेंटर लॉन्च करण्यात आले. या सेंटरमध्ये अॅस्टर वायनाडकडून मल्टी-डिसेप्लिनरी रेज्युवेनेशन पॅकेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्यामध्ये आधुनिक औषधे, आयुर्वेद, योगा, मनोरंजनपर क्रियाकलाप आणि मोकळ्या वेळेतील सहलींची सुविधा आहे.

सूर्या स्टेज अँड फिल्म सोसायटीचे संस्थापक संचालक सूर्या कृष्णमूर्ती यांनी या सेंटरचे उदघाटन व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. या प्रसंगी अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. आझाद मुपेन, यांची उपस्थिती लाभली. अॅस्टर इंडियाचे सीईओ डॉ. हरीश पिल्लाई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

यावेळी बोलताना सीएमडी अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे डॉ. आझाद मुपेन म्हणाले की, कोविड-पश्चात रोगमुक्तीनंतर मोठ्या प्रमाणावर लोकांनी शारीरिक तसेच मानसिक समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. “कोविड-19 रोगमुक्तीनंतर अनेकांना काही समस्यांचा सामना करावा लागतो आहे. बऱ्याच व्यक्तींना कोविड-19 ची बाधा होऊन गेल्यावर श्वास घेण्यात अडचणी जाणवत आहेत, काहींना छातीत वेदना तर अन्य काही समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्मृतीभ्रंश, एखाद्या कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचणीही जाणवतात. बऱ्याच व्यक्तींनी सांधेदुखी होत असल्याचे सांगितले आहे”.

याप्रसंगी बोलताना डॉ. आझाद मुपेन म्हणाले की, “काही लोकांमध्ये कोविडमुळे दीर्घकालीन आजारही आढळून येतो. या रोगावर बहुतांशी आधुनिक औषधांचा वापर करण्यात आला आहे. मात्र पूर्ण रोगमुक्ती तसेच कोविड-पश्चात उपचारात सर्व व्यापक यंत्रणांचा समावेश असणे आवश्यक ठरते. त्यासाठी वायनाडशिवाय अन्य पर्याय असूच शकत नाही. याठिकाणी आवश्यक तेव्हा डॉक्टर, योग प्रशिक्षक तर उपलब्ध होतातच, शिवाय इथला निसर्ग उत्तम रोग-निवारकाचे काम करतो.

बशीर यु.हे डीएम एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त असून त्यांनी अॅस्टर वायनाड येथे रेज्युव’चे वेब पेज लॉन्च केले. तर अॅस्टर एमआयएमएस कन्नूर, कालिकत आणि कोट्टकलचे क्लस्टर सीईओ फरहान यासीन आणि मेडीकल सुप्रिटेंडट डॉ. मनोज नारायण यांनी एकत्रित ब्रोशरचे प्रकाशन केले.  (माहितीपुस्तिका) अॅस्टर एमआयएमएस कोझिकोडे येथील सल्लागार, न्यूरोसर्जन डॉ. जेकब अलाप्पाट्ट यांनी व्हीडियो प्रसिद्ध केला. या कार्यक्रमाला वायनाड टुरिझम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष वांचिस्वरन आणि डीएम डब्ल्यूआयएमएस, असिस्टंट जनरल मॅनेजर, ऑपरेशन्स डॉ. शानवास पल्लीयाल यांची विशेष हजेरी लाभली. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close