Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

Assistance to farmers in शेतक-यांना निर्यातीस अवशेष मुक्‍त डाळिंब विकसित करण्‍यास सहाय्य

शेतक-यांना निर्यातीस अवशेष मुक्‍त डाळिंब विकसित करण्‍यास सहाय्य 

: मृदा व्यवस्थापन, पिकाचे पोषण आणि कीटक व्यवस्थापन यांच्या क्षेत्रामध्ये काम करणारी स्पेशलाइझ्ड मायक्रोबियल कंपनी कॅन बायोसिस प्रा. लि. निर्यातीस अनुकूल अवशेष मुक्‍त डाळिंबासाठी उत्‍पादने सादर करत आहे.

कॅन बायोसिस भारताच्‍या ४ राज्‍यांमधील डाळिंब उत्‍पादकांसोबत सहयोगाने काम करत आली आहे. कंपनी डाळिंबाचे उत्‍पादन करणा-या शेतक-यांना थ्री डी डोस ही सुलभ पद्धती उपलब्ध केले आहे . या पद्धतीमध्‍ये शुभारंभ डोस (मृदा आरोग्‍य व्‍यवस्‍थापन + खतांचा कार्यक्षम वापर), ग्रीन (एकीकृत पोषण व्‍यवस्‍थापन) आणि रेड डोस (रोग + कीटक व्‍यवस्‍थापन) यांचे अद्वितीय संयोजन आहे.कॅन बायोसिस देत असलेल्‍या जैव कीटकनाशकांमध्‍ये ट्रायकोडर्मा व्हिरिडसह (ट्रायको-शील्‍ड कॉम्‍बॅटTM) संयोजित ट्रायकोडर्मा हर्जियनम (नेमास्टिनTM)चा समावेश आहे. हे कीटकनाशक शेतक-यांना त्‍यांचे पिकांचे फ्युजारियम सारख्‍या मूळांचे नुकसान करणा-या बुरशीपासून, तसेच मूळांच्‍या टोकाशी येणा-या सूत्रकृमींपासून (नेमाटोड्सपासून) प्रतिबंध करण्‍यामध्‍ये मदत करतात. याने मर रोगापासून बचाव होण्यास मदत होते. पाण्याचा ताण असतांनाहि  एनपीके जैव खत (टीम बायो ३TM) असलेल्‍या संयुक्‍त डोसचा वापराने पिकाचे सर्वोत्तम पोषण होण्यास मदत होते आहे . याने भरीव, साखरेची रसाळ चमक असलेले सर्वोत्तम डाळिंबाचे उत्‍पादन होते. इराण किंवा स्‍पेनमधील डाळिंबापेक्षा हे डाळिंब सर्वोत्तम आहे. अलिकडील वर्षांमध्‍ये डाळिंबाने भारताच्‍या पर्जन्‍य आधारित भागांमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे आणि सध्‍या भारताचा डाळिंब उत्‍पादनामध्‍ये पहिला क्रमांक आहे. भारतातील डाळिंबाच्‍या एकूण उत्‍पादनांपैकी ८० टक्‍के उत्‍पादन महाराष्‍ट्रामध्‍ये होते, त्‍यानंतर कर्नाटक, गुजरात व आंध्रप्रदेश या राज्‍यांचा क्रमांक आहे. यामध्‍ये सोलापूर, अहमदनगर, पुणे व सांगली येथील दुष्‍काळग्रस्‍त तालुक्‍यांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि उत्‍साही शेतक-यांच्‍या प्रामाणिक प्रयत्‍नांमुळे हे शक्‍य झाले आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अधिकतम उत्‍पादक आहेत, जे मायक्रोबियल (थ्री डी डोस) सारख्‍या स्‍मार्ट पद्धतींचा वापर करत डाळिंब उत्‍पादित करून निर्यात करू शकतात आणि जवळपास त्‍यांच्‍या डाळिंबांना नकार मिळतच नाही.

बदलत्या वातावरणाने रोग निवारणासाठी शेतकरी अधिक प्रमाणात रासायनिक बुरशीनाशकांचा उपयोग करतात, ज्‍यामुळे फळांवर कीटकनाशकांचे अवशेष राहतात आणि फळांची निर्यात होण्‍याला नकार मिळतो. दरवर्षी निर्यातीसंदर्भातील मार्गदर्शकतत्त्वे कीटकनाशकांच्‍या अवशेष मर्यादांसंदर्भात अधिक कडक बनत आहेत. शेतकरी रासायनिक कीटकनाशकांच्‍या वापराबाबत खूपच दक्षता घेत आहेत, कारण प्री-हार्वेस्‍ट इंटर्व्हल – पीएचआय कापणीपूर्वी १०० ते ११० दिवसांदरम्‍यान असणे गरजेचे आहे. या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी कॅन बायोसिस बॅसिलस सबटिलिस (मिलास्टिन केTM) आणि सुडोमोनास फ्लोरेसेन्स (सुडोTM) यावर आधारित जैव बुरशीनाशक करते. या कीटकनाशकांचे कोणताच पीएचआय कालावधी नाही, ज्‍यामुळे ही कीटकनाशके कापणीच्‍या दिवसापर्यंत वापरता येऊ शकतात.

डाळिंब हे मधमाशींद्वारे परागीकरण होणारे पीक आहे. ज्‍यामुळे कीटकनाशकांचा योग्‍य प्रकारे उपयोग न केल्‍यास फळ लाग होत नाही. तसेच किडींच्या प्रादुर्भावाने फळ खराब होतात. कॅन बायोसिसने  कीटकांच्‍या संसर्गावर प्रतिबंध ठेवण्यासाठी ब्यूव्हेरिया बसियानावर (ब्रिगेडTM आधारित जैव कीटकनाशक उत्पादित करते. या या जैव कीडनाशकाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते मानव, पशुधन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परागकणांना कारणीभूत असलेल्या मधमाश्यांसाठी पूर्णपणे निरोगी असतात.

कॅन बायोसिस प्रा.लि.च्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रीमती संदीपा कानिटकर म्‍हणाल्‍या, ”भारतीय कृषी-हवामान स्थितींचे लक्षणीय पैलू म्‍हणजे आपण वर्षभर डाळिंबाचे उत्‍पादन करू शकतो. पणत्‍या कालावधीदरम्‍यान स्‍पेन व इराणसोबत मर्यादित स्‍पर्धेमुळे आंबे” बहार हा निर्यातीसाठी सर्वोत्तम आहेत. मृग व हस्‍त बहरसाठी आपल्‍याला युरोपसाठी शिपिंग खर्च व कार्यक्षमतेसंदर्भात स्‍पेन व इराणसोबत स्‍पर्धा करावी लागते. म्‍हणूनच लाभक्षमता सानुकूल करण्‍यासाठी शेतकरी नोंदणीकृत व दर्जेदार मायक्रोबियल उत्‍पादनांचा वापर करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये परिपूर्णता आणत खर्चांचे नियोजन करू शकतात. जमिनीच्‍या सुपीकतेवरील नियंत्रण देखील कमी खर्चात ‘ दर्जाच्‍या उत्‍पादनासंदर्भात फळांचा दर्जा वाढवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. एकूण खर्चांपैकी ३० टक्‍के खर्च मायक्रोबियल उत्‍पादनांसाठी करण्‍यावर अधिक भर दिला पाहिजे. या उत्‍पादनांमध्‍ये पायाभूत डोस – सेंद्रिय खत (स्‍पीड कंपोस्‍ट)दर्जेदार जैव खते (टीम बायो TMव (ताबा जीTMआणि सीआयबी नोंदणीकृत व सेंद्रियदृष्‍ट्या प्रमाणित जैव कीटकनाशक (ट्रायको-शील्‍ड कॉम्‍बॅटTM), (नेमास्टिनTM), (मिलास्टिनTM), (सुडोTMयांचा समावेश आहे. ट्रायकोडर्मा व्हिरिडसह (ट्रायको-शील्‍ड कॉम्‍बॅटTMसंयोजित ट्रायकोडर्मा हार्जियनम (नेमास्टिनTMअसलेल्‍या जैव कीटकनाशकांच्‍या वापरामुळे डाळिंबामधील मूळांचे नुकसान करणा-या बुरशीविराधोत संरक्षण करण्‍यामध्‍ये शेतक-यांना मदत झाली आहे. पीएयू – लुधियाना व यूएसएच बागलकोटसोबत २ वर्षांच्‍या विद्यापीठ चाचण्‍या आणि व्‍हीएनएमकेव्‍ही – परभणीसह १ वर्षाच्‍या चाचणीमधून जीवाणूचे अनिष्‍ट परिणाम व बुरशीजन्‍य आजारांवर उत्तम नियंत्रण असल्‍याचे दिसून आले आहे. मायक्रोबियल्‍स उत्‍पादकता व सुरक्षिततेवर भर देण्‍यासोबत स्‍मार्ट प्रीसीजन ऍग्रीकल्‍चर असण्‍याबाबत सतत क्षमता सिद्ध करत आहेत.

कॅन बायोसिसमध्‍ये आम्‍ही ४ भारतीय राज्‍यांमधील डाळिंब उत्‍पादन करणा-या शेतक-यांसोबत सहयोगाने काम करत आलो आहोत. आम्‍हाला आंतरराष्‍ट्रीय सेंद्रिय प्रमाणन मिळाले आहेतजसे आयएमओ (IMO) व इकोसर्ट (ECOCERT), जे शेतक-यांना अतिरिक्‍त मान्‍यता देतात. पुण्‍यातील आमच्‍या प्रगत आयएसओ (ISO) मान्‍यताकृत उत्‍पादन केंद्रामध्‍ये मायक्रोब्‍स (सूक्ष्‍मजीव) उत्‍पादित केले जातात. आम्‍ही म्‍हटल्‍याप्रमाणे हवामानावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाहीपण मायक्रोब्‍सच्‍या वापरासाठी सुसज्‍ज असणे हा शेतक-यांच्‍या गुंतवणूकींला निर्माण होऊ शकणारा धोका कमी करण्‍याचा सुरक्षित मार्ग आहे.”   

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close