Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मराठा सेवा संघ नायगाव तालुकाध्यक्ष पदी अशोकराव पवळे तर सचिवपदी संतोष कल्याण यांची निवड

नांदेड:मराठा सेवा संघ नायगाव नविन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यासाठी नायगाव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ. जीवन चव्हाण होते.निवड निरीक्षक म्हणून मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उध्दवराव पाटील सुर्यवंशी, जिल्हा सचिव रमेश पवार जिल्हा कार्याध्यक्ष इंजि. संजय लोंढे,संघटक सुधाकर थडके यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख एम.जी कदम,अशोक बावणे,राजु बावणे,बंडु उर्फ दत्ता पाटील आदींची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या स्मृती दिनानिमित्य  विनम्र अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने झाली. बैठकीचे प्रास्ताविक अशोकराव पवळे यांनी केले.सदर बैठकीतील उपस्थित समाज बांधवांस सखोल आणि विस्तृतपणे मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार यांनी केले, त्यांनी मराठा सेवा संघाचे ध्येय धोरणे व वाटचाल, पंचसुत्री यावर प्रकाश टाकला आणि गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता निर्माण करण्याचे आवाहन केले.यानंतर मराठा सेवा संघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष उध्दवराव पाटील सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी मनोगतातून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून युगनायक अॅड पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी मराठा समाजाचा मन,मनका, मेंदू सशक्त केलेला असुन सिंधखेड येथील भव्य दिव्य प्रस्तावित जिजाऊ सृष्टीसाठी आणि नांदेड नवा मोंढा येथे  गोर गरीब हुशार मुलींच्या शिक्षणासाठी तयार होत असलेले १०० मुली राहतील अशी चार मजली देखणी इमारत सर्व सुख सुविधेसह वसतिगृहासाठी मदत निधी उभा करावा आणि समाज प्रबोधन पर्व चालवावे असे सांगितले. याच बैठकीत सर्वानुमते मराठा सेवा संघ नायगाव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःला झोकून देवून समर्पक आणि निस्वार्थ भावनेतून अवितश्रांतपणे सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे केंद्र प्रमुख अशोकराव पवळे यांची निवड करण्यात आली तर सचिव म्हणून तरूण तडफदार नेतृत्व   संतोष कल्याण, कार्याध्यक्षपदी देविदासराव जाधव, कोषाध्यक्षपदी नारायणराव शिंदे, तालुका उपाध्यक्ष म्हणून गंगाधर चव्हाण, प्रवक्ता पदी नागनाथ वाढवणे,सल्लागार म्हणून व्यंकटराव जाधव, जिल्हा संघटकपदी प्रा.डाॅ. जीवन चव्हाण यांची निवड करण्यात आली.नुतन तालुका कार्यकारिणी सर्व पदाधिकारयांचे मराठा सेवा संघ नांदेड दक्षिणच्या वतीने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. बैठकीचे सुरेख सुत्रसंचालन जाधव डी.टी. यांनी केले तर आभार उत्तम शिंदे यांनी मानले बैठकीस बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close