अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झी टॉकीज सादर करणार चित्रपटांचा खास नजराणा मराठी मनोरंजन विश्वातील बहारदार व्यक्तिमत्व म्हणजे चतुरस्त्र अभिनेते अशोक सराफ. आपल्या दमदार अभिनयाने गेली अनेक वर्ष रसिकांचं त्यांनी भरपूर मनोरंजन केलं. वाढतं वय त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आड कधीही आलं नाही.शनिवार ४ जून रोजी अशोक सराफ आपला अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून झी टॉकीजने अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांचा नजराणा झी टॉकीजच्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. शनिवार ४ जूनला सकाळी १०.३० वा. ‘आलटून पालटून’, दुपारी १.०० वा. ‘धूमधडाका’, दुपारी ४.३० वा. ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, सायंकाळी ७.०० वा. ‘बिनकामाचा नवरा’, रात्री ९.३० वा. ‘शंभर नंबरी सराफ’ या अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या मेजवानीचा आस्वाद झी टॉकीजच्या प्रेक्षकांना संपूर्ण दिवसभर घेता येणार आहे. आपल्या विनोदी पण दमदार अशा अभिनयाने, अशोक सराफ यांनी तब्बल पाच दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झी टॉकीजने चित्रपटरूपी शुभेच्छांनी त्यांच्या कारकिर्दीला व भावी आयुष्यासाठी हा मानाचा मुजरा केला आहे.