Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

प्रभाग क्रमांक नऊ मधील विकास कामे मार्गी लावा. सर्वसाधारण सभेत नगर सेवक बारहात्ते यांनी केली मागणी

मानवत / अनिल चव्हाण

मानवत नगर परिषदेच्या सर्व साधारण सभेत आज दि. 18-12-20 रोजी मानवत नगर परिषदेची सर्व साधारण सभा संपन्न झाली. या सर्व साधारण सभे मध्ये प्रभाग क्रमांक 9 मधील व मानवत शहरातील सद्य स्थितीत नागरिकांना असणाऱ्या समस्या व प्रभागातील विविध विकास कामांचे विषय मांडून मंजूर करून घेण्यात आले असून ते तात्काळ मार्गी लावा अशी मागणी अॅड ॠषिकेश बारहात्ते यांनी केली. प्रभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील 1) जिजाऊ नगर, नरवाटे कॉलोनी, शनि मंदिर परिसर, नगर परिषद वसाहत, गणपती मंदिर समोरील बिडी कारखाना, गोलाईत नगर, कुमावत कॉलणी शाहू नगर येथील रस्ते , व नाली बांध काम करण्यात यावेत 2) पोलीस कोर्टर रोड आर. सि. सी बांध काम करण्यात यावे. 3) जिजाऊ नगर मधून डम्पिंग ग्राउंड ला जाणारा रस्ता सि. सि. रोड करणे व सुशोभीकरण करणे 4) बंजारा हिल्स मारोती मंदिर जवळील पुलाची रुंदी वाढवून बांधकाम करणे.
घरकूल.
1) रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास घरकुल लाभार्थी यांना तात्काळ 5 ब्रास मोफत वाळू वाटप करणे 2) पहिला व दुसरा डीपी आर मधील बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थी यांना तात्काळ पुढील हप्ते वितरित करणे. 3 ) तिसरा Dpr मधील लाभार्थी यांना तात्काळ हप्ते वाटप करण्यास कार्यवाही करणे. 4) हनुमान नगर (तांडा ) येथील नागरिकांना गाव हद्द वाढावून घरकुल चा लाभ तात्काळ देणे.

पाणीपुरवठा…

1) प्रभागात टाकण्यात आलेल्या नवीन सर्व पाईप लाईनचालू करणे बाकी असलेल्या पाईप लाईन तात्काळ सुरु करणे 2) पाईप लाईन टाकताना ज्या भागातील आर सी सी रोड खराब झाले आहेत ते तात्काळ दुरुस्ती करणे 3) हनुमान नगर तांडा येथे तात्काळ पाण्याची सोय करणे
प्रभागात सद्या अनेक विकास कामे चालू असून उर्वरित वरील सर्व कामे सर्व साधारण सभेत मांडून यांना मंजुरी घेण्यात आली. या बाबतचे मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी जसयवंत सोनवणे नगराध्यक्ष एस.एन.पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी प्रभाग क्रमांक ९ मधिल सर्व विकास कामाची रूपरेषा मांडून ती लवकरात लवकर हाती घेऊन पूर्ण करावी अशी मागणी अॅड, ॠषिकेश बारहात्ते यांनी केली. या वेळी.सर्व विषयांना सकारात्मक चर्चा होऊन वरील कामे लवकरच सुरु होतील असे मत मूख्याधिकारी जयवंत सोनवणे व नगराध्यक्ष एस.एन. पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close