Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

मुंबई : टीआरपी घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या मृत्यू प्रकरणात गोस्वामी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्वय नाईक यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईनेदेखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळे आलेल्या नैराश्येतून आत्महत्या करत असल्याचा आरोप नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिले होते. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. अन्वय नाईक यांची मुलगी आज्ञा हिने मे महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याची चौकशी अलिबाग पोलिसांनी केलेली नाही, अशी तक्रार तिने केली होती. त्यानंतर या प्रकरणाची नव्यानं सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले होते. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पोलिस ठाण्यामध्ये येऊन जबाब नोंदवण्यासाठी अर्णब यांना पोलिसांनी अनेकदा नोटिस पाठवली होती. मात्र, मी पोलिसांशी अजिबात बोलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर आज पोलिसांनी थेट कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. त्याचबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने कांदिवलीहून फिरोझ शेख आणि जोगेश्वरी येथून नितेश सारडा यांनाही अटक केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close