MH20 Live Network

पुरातत्व विभागानेच देवगिरी किल्ल्याला लावली आग :विनोद पाटील

औरंगाबाद : ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याला काल शुक्रवारी आग लागली होती. अथक परिश्रमानंतर ती आग विजवण्यातआली. हि आग पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी लावल्याचा आरोप समाजसेवक विनोद पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता याविषयी नवीन वाद समोर आला आहे. या विषयीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
देवगिरी किल्ल्याला आग लावण्याचे पाप पुरातत्व विभागाने केले आहे. मागील चार वर्षापासून याबद्दल रणनीती आखण्यात येत होती, चार वर्षापासून किल्ल्या मधील आणि जवळील गवताची हर्राशी करण्यात आली नाही. कोरोडोचे काम फक्त कागदावरच दाखवण्यात आले आहे. या कामाची माहिती गावकऱ्यांनी विचारल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी आग लावण्यात आली.

पुरातत्व विभागानेच देवगिरी किल्ल्याला लावली आग :विनोद पाटील

https://www.facebook.com/Mh20live-102121051801545

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आलेल्या गाडीसाठी रस्ता सुद्धा नव्हता. परंतु प्रत्यक्षात कागदोपत्री करोडो रुपयांचे रस्ते झाल्याच्या नोंदी आहेत. या आगीमुळे हा कारभार तरी उघड पडला.

यासह प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे अनेक मुद्दे आहेत, जे सर्व आम्ही वरिष्ठ पातळीवर मांडणार आहोत आणि याबाबतीत पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारला करणार आहोत.

पोलीस निरीक्षक आडे मॅडम यांनी आग विझविण्यासाठी खूप मेहनत घेतली, आम्हाला त्वरित संपर्क साधून पाण्याचे टँकर उपलब्ध केले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
याउलट पुरातत्व खात्याने आग विझविण्यासाठी कुठलेही सहकार्य केले नाही, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. यातूनच त्यांचा हेतू स्पष्ट होतो

https://fb.watch/43f1wMqUf6/

दौलताबाद हे माझं मूळ गाव आहे, दौलताबाद गावात व देवगिरी किल्ल्याच्या परिसरातच मी लहानाचा मोठा झालो, गाव व किल्ला आमची अस्मिता आहे. याठिकाणी जर कोणी भ्रष्ट काम करत असतील, माझ्या गावकऱ्यांचे दुकान जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना बरबाद करण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. त्यांना दंड मिळेलच!

https://www.facebook.com/102121051801545/videos/1337606926637805

*विनोद नारायण पाटील, दौलताबादकर

Exit mobile version