Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता 510 पदांना मंजूरी

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश

अलिबाग,जि.रायगड :- शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट – अ ते गट – क मधील नियमित 185 पदे व विद्यार्थी पदे 121 त्याचप्रमाणे गट-क ( बाह्यस्त्रोताने ) 139 पदे व गट- ड ( बाह्यस्त्रोताने ) 65 पदे अशी एकूण 510 व 4 टप्यात निर्माण करण्यास नुकतीच राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे .

हेही वाचा “अटल आनंदवन घन वन” प्रकल्प जणू देवस्थानाची निर्मितीच :प्रधान मुख्य वन संरक्षक श्री.जीत सिंग

मंजूर 510 पदांमध्ये गट – अ मध्ये एक अधिष्ठाता, 21 प्राध्यापक, 22 सहयोगी प्राध्यापक , एक मुख्य शासकीय अधिकारी अशा 45 पदांचा समावेश आहे . गट – ब मध्ये 46 सहाय्यक प्राध्यापक व एक प्रशासकीय अधिकारी अशा 47 पदांचा समावेश आहे. गट- क मध्ये एक ग्रंथपाल, एक सांख्यिकी सहाय्यक, दोन कार्यालयीन अधीक्षक, नऊ लघुलेखक, चार वैद्यकीय समाजसेवक, 15 वरिष्ठ सहाय्यक, एक रोखपाल, 9 प्रयोगशाळा वाहतूक तंत्रज्ञ, 2 सहाय्यक ग्रंथपाल, 13 वरिष्ठ लिपिक, एक लघुटंकलेखक, दोन भांडारपाल, 31 कनिष्ठ लिपिक, एक ग्रंथसूचीकार फोटो एक प्रक्षेपक अशा एकूण 93 पदांचा समावेश असून बाह्यस्त्रोताने हिसकावून भरती होणारी वर्ग -3 ची एकूण 139 तर वर्ग -4 ची एकूण 65 मंजूर करण्यात आली आहेत.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

विद्यार्थी पदे एकूण 121 असून त्यामध्ये चिकित्सालयीन पाम्यनिदेशक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी, निवासी या पदांचा समावेश आहे. प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्यातील पदे टप्पा निहाय मंजूर होणार असून, प्रथम वर्षाबाबतची पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरीत द्वितीय, तृतीय व चतुर्थ टप्यातील पदे संबंधित वर्षी निर्माण होतील .
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकानुसार वर्षनिहाय, आवश्यक पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे संचालक , वैद्यकीय शिक्षण व संशोधन , मुंबई यांनी सादर केल्यानुसार अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता निर्माण करावयाच्या पदांच्या पदनामनिहाय पदनिर्मितीस मान्यता देण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे होता, त्याचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करुन त्यास शासनाची मंजूरी प्राप्त करुन घेण्यात यश मिळविले आहे.

हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीची प्रशासकीय मान्यता प्राप्त होताच, इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम त्वरित सुरु करण्यात येऊन जून 2021 मध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष आरसीएफ वसाहतीमधील घेण्यात आलेल्या इमारती व रायगड जिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुरु होईल. नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होताच नव्या इमारतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close