Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडाशेतीविषयक

अंतरगावात पालकमंत्री पदन रस्ता मजबुती करणासाठी मंजुरी

अखेर माजी सरपंच संभाजी पाटील शिंदे याच्या पाठपुराव्याला यश 

www.mh20live.com

    नायगाव ता/ शेषेराव कंधारे 
              अंतरगाव येथील गावातील अंतर्गत पादन रस्ता मजबुती करण रस्त्यासाठी ३७ लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी सरपंच संभाजी पाटील शिंदे यांनी दिली.
          अंतरगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल आणण्यासाठी रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळे गावांमध्ये दररोज भांडणतंटे असे निर्माण होत असे त्याचबरोबर शेतकऱ्यांना बागायत सारखे पीक घेता येत नव्हते अशा अनेक आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते अशा सर्व अडचणी लक्षात घेऊन अंतरगावचे माजी उपसरपंच संभाजी पाटील शिंदे यांनी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केले आणि त्यांच्या प्रयत्नांमधुन गावातील सर्व पादन रस्त्यांची कच्चे कामे पूर्ण झाले असून या कामाचे स्वरूप पाहून नायगाव तालुक्याच्या तहसीलदार सुरेखा नांदे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव केंद्रे व जे.ई. रायबोरे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री पाणंद रस्ता मजबुती करण्यासाठी प्रस्ताव अंतरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले होते  त्यांच्या या मागणीची दखल घेऊन पालकमंत्री पादन रस्ता मजबुती करण्यासाठी पांच किलोमिटर गावातील सर्व पादन रस्त्यास मंजुरी दिली आणि काम चालू करण्यासाठी आदेश निघाल्यामुळे जवळपास दिड वर्षापासुन देण्यात आलेल्या त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्याने ग्रामस्थानातुन आनंद व्यक्त केला जात आहे.         

  
         

अंतरगाव गावातील अंतर्गत सर्वच पादन रस्त्याला पालकमंत्री पादन रस्ता मजबुती करण्यासाठी प्रति किलो मीटर ७४२००लक्ष प्रमाणे पाच कि.मी.साठी सदोतीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आल्याने अंतरगाव येथील ग्रामपंचायतचे सूत्र हाती नसतानाही माजी उपसरपंच संभाजी पा. शिंदे यांनी अनेक वर्षापासून जो रस्ता करण्यासाठी कोणाचेही लक्ष नव्हते त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करून अवघ्या काही दिवसात हा रस्ता मंजूर करून घेतल्यामुळे त्यांचे स्वागत केले जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close