Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करा

कृषीमंत्री दादा भुसे यांचे आवाहन

मुंबई – शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ ‘एकाच अर्जाद्वारे’ दिला जाणार आहे. राज्य सरकारच्या कृषी योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज करण्याचे आवाहन कृषीमंत्री दादा भुसेंनी केलेय. त्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, असे दादा भुसेंनी सांगितले.

यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तसेच, त्यांनी शेतीशी निगडीत इतर बाबींकरिता या पोर्टलवर अर्ज करायचा आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडणे अनिवार्य आहे. https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॅाप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र अशा अनेक माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करता येऊ शकते.

‘वैयक्तिक लाभार्थी’ म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. ज्यांच्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद केल्यानंतर त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल. अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना दिला जाणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

महाडीबीटी पोर्टलवर माहिती भरण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यापूर्वी अर्जदारांनी माहिती भरली असल्यास त्यांना नव्याने भरण्याची आवश्यकता नाही. मात्र लाभाच्या घटकांमध्ये शेतकरी त्यांना हवा तसा बदल करू शकतात.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close