Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकऱ्यांनी तुरीसाठी ऑनलाईन नोंदणी करावयाची औरंगाबाद जिल्ह्यात 7 खरेदी केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात येणार

तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना आवाहन

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने तूर खरेदी  सुरु करावयाची आहे. त्याकरीता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी 28 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी तुरीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यांनी तूर विक्रीला आणल्यास त्यांना प्रति क्विंटल रु. 6 हजार दर मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण 7 खरेदी केंद्रावर तूर खरेदी  सुरु करण्यात येणार आहे, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस.के. पांडव यांनी कळविले आहे.

औरंगाबाद (जाधववाडी), गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, फुलंब्री या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आपली खरीप हंगाम 2020-21 मधील पिकांची नोंदणी असलेल्या मूळ सातबारा, पीकपेरा, आधारकार्ड, बॅंक  पासबुक (स्पष्ट दिसणारी झेरॉक्स प्रत) इत्यादी कागदपत्रे घेऊन नोंदणी करावी. खरेदी केंद्रावर केंद्रशासनाने निश्चित केलेल्या स्पेसीफीकेशन प्रमाणे एफ.ए.क्यू प्रतीचा माल आणावा. शेतकऱ्यांनी मालाची चाळणी करुन पूर्णपणे वाळवून आणावा, ज्यामध्ये  किमान आर्द्रता (ओलावा) 12 टक्के पर्यत असावी. नोंदणी झाल्यानंतर खरेदी करीता शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एसएमएसव्दारे माल आणण्याबाबत कळविण्यात येईल. जेणेकरुन केंद्रावर शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार नाही. शेतमालाच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात खरेदीची रक्कम जमा केली जाईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close