Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी आवाहन

औरंगाबाद :फळे व भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये, तेलबिया उत्पादने इत्यादीवर आधारित अन्न प्रक्रिया चालविणारे किंवा स्थापित करित असलेले शासकीय, सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक, कंपनी, गट, महिला स्वयं:सहायता गट, खाजगी उद्योग क्षेत्र, ग्रामीण बेरोजगार युवक, सहकारी संस्था अशा अन्न प्रक्रिया प्रकल्पांपैकी फळे व भाजीपाला सारख्या नाशवंत शेतमालाच्या प्रक्रियेच्या प्रकल्पांना मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेत प्राधान्य आहे. या योजनेचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

कारखाना व यंत्रे (Plant & Machinery) आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी मागे व पुढे कामासाठी अत्यावश्यक असणारी दालने (Civil Work for housing processing unit) यांच्या बांधकाम खर्चाच्या 30% अनुदान, कमाल मर्यादा रु. 50.00 लाख या योजनेंतर्गत अनुदान ‘क्रेडिट लिंक्ड बँक एंन्डेड सबसिडी’ या तत्वानुसार 2 समान वार्षिक हफ्त्यात प्रकल्प पूर्ततेनंतर व पूर्ण क्षमतेने उत्पादनात आल्यानंतर (Commissioning of project and on start of production to full design capacity) देण्यात येईल. प्रकल्पाला मंजूर करण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम किमान दीडपट असावी, अशा प्रकारे योजनेत अर्थसहाय्याची तरतूद असल्याचेही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close