Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अंतर्मना आचार्य प्रसन्नसागर महाराज यांचे ५० दिवसांची अंखड उपवास व मौनव्रत साधना चा महापारणा उत्साहात संपन्न


औरंगाबाद प्रतिनिधी – मुनि दिक्षेनंतर आपल्या जीवन काळात भगवान महावीर स्वामी नंतर कठोर तपस्या केलेले तपस्वी सम्राट सन्मती सागरजी महाराज यांचे पदचिन्हावर अगे्रसर पुष्पगिरी तिर्थ प्रणेता यांचे उपवनातील सुगंधित पुष्प व आत्मीय शिष्य भारत गौरव तपाचार्य अंतर्मना प्रसन्नसागरजी महाराज व्दारा आपल्या कठोर तपस्येला गती देत जैन धर्मातील महत्वाचे महाकाव्य भक्तांबर पाठाचे ५० दिवस अखंड निरंकार उपवास व मौनव्रत साधना कोणालाही न भेटता, संपर्कात न येता संपन्न केला. हि साधना पुर्ण झाल्यानंतर संगस्थ मुनिश्री पियुषसागरजी महाराज यांच्या निर्दशानुसार देशभरातील गुरâभक्तांनी आपल्या आपल्या घरी जिन मंदिरात भक्तांबर पाठचे अंतर्मना  वाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन भक्तांबर पारणेची अनुमोदना महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
अंतर्मना आचार्य मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांचा २०२० चा मंगल चातुर्मास मंशापुर्ण                     महावीर तिर्थक्षेत्र गंगानहर मुरादानगर उत्त्तरप्रदेश येथे सानंद संपन्न होत असुन परंतु येथे आपल्या गुरâंच्या साधना काळात त्यांच्या उत्साही गुरâभक्तांनी महाकाव्य भक्तांबर समितीच्या माध्यमातुन देशभरातील गुरâभक्तांनी आपल्या आपल्या घरी मंदिरात उपवासाची अनुमोदन करण्यासाठी व पारणा महोत्सव निर्विघ्न संपन्न होण्यासाठी भक्तांबर महाकाव्याचे पठन देशभरात १ लाख ८० हजारांच्या वर करâन रेकॉर्ड बनविला. अंतर्मना आचार्य मुनिश्री प्रसन्नसागरजी महाराज यांनीr सोमवारी उपवासाच्या ५० दिवासांच्या साधनेला विराम देत त्यागी व व्रति, नियम पालन करणा-या संकल्पित भक्तांव्दारे विधि पुर्वक अन्न,जल ग्रहन करâन आपल्या उपवासाची सांगता केली. यावेळी देशभराती गुरâभक्त मंशा महावीर क्षेत्र मुरादानगर येथे आपल्या गुरांचा ऐतिहासिक पारणा पाहण्यासाठी    पोहचले होते. या पारणा महोत्सवास आर्यिका गननी ज्ञानमती माताजी, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला, आ.विजयरत्न सुंदर सुरीश्श्वर मसा यांचे अनुमोदना पत्र प्राप्त झाले व व्रताधिकारी स्वस्तीश्री रविंद्रकिर्तीजी स्वामी व सुशिल जैन मैनपुरी यांनी गुरâदेव प्रति विनयांजली वाहिली यावेळेस संपुर्ण देशातील जैन समाज जैन चॅनेलव्दारे कार्यकम पाहुन हा सोहळा आपल्या डोळयात साठविला.
या कार्यकमाची संपुर्ण माहिती देतांना प्रचार प्रसार प्रमुख नरेंद्र अजमेरा,पियुष कासलीवाल व रोमिल जैन यांनी असे सांगीतले की अंतर्मना यांनी या पुर्वी १६, ३२, ३५, ६४, १८६, दिवसांची कठोर उपवास व मौनव्रत साधना सानंद संपन्न केली आहे. आयोजनाच्या पुर्वी तिर्थक्षेत्रामध्ये मुनि पियुषसागरजी महाराज यांच्या व्दारे मंत्रोपचार व ब्रम्हचारी तरâणभैय्या यांच्य व्दारे वेदी विधान करâन भगवंताचा कलसा अभिषेक व शांतीधारा अनुमोदना स्वरâप संकल्पित अखंड २४ तासांची भक्तांबर पाठ पुर्णतार्थ समर्पित केले. ..२..
यावेळी हस्तीनापुरचे भटटारक, व्रताधिकारी रविंंद्रकिर्ती स्वामी, ब्र.गिता दिदी, अंतर्मना आचार्यश्रींची पुर्वाश्रमणीची आई शोभादेवी अज्जुभैया सेठी, विजय जैन, नितीन जैन, गुलजारीलाल नविन जैन, सजन बंटी जैन, अशोक जैन, सुशिल जैन, मनिष जैन, विपुल छाबडा, विवेक जैन, विमल जैन, अनुज जैन, त्रिलोक जैन ताऊअहिंसा चॅनेल आदींची उपस्थिती होती. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महाकाव्य भक्तांबर समितीचे रोहित बाकलीवाल किशनगढ, निलेश पहाडे, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल औरंगाबाद, मनोज पाटणी नाशिक, ताराचंदजी जैन अजमेर, डॉ.संजय जैन इंदौर, विपुल जैन जयपुर, सुरेंद्र सेठी धुलियान, विकल्प सेठी, आकाश जैन सोनकच, गौरव जैन परतवाडा, नितेश पाटणी इचलकरंजी यांचा १ लाख ८० हजार पाठ करण्यामागे योगदान लाभले. तसेच आचार्य श्री.चंद्रप्रभु महाराज यांनी चंदाबाबा गु्रप व चंदनमाला गु्रपच्या माध्यमातुन २५ हजार १०८ पाठाचे पठन करâन या कार्यकमाची शोभा वाढविली तसेच या कार्यकमाची सुरâवात दिनांक १६ ऑगस्ट रोजी आर्यिका विशाश्री माताजी यांच्या सानिध्यात राजाबजार जैन मंदिर औरंगाबाद येथे अध्यक्ष ललीत पाटणी, निलेश पहाडे, नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करâन करण्यात आली.  
आता मौनच राहण्यात फायदा आहे. बाहेरचे वातावरण अजुन काही काळ सुुधारेल असे वाटत नाही. त्यामुळे रहा बाहर व जीवन जगा आंतरआत्म्याचे असे अंतर्मना प्रसन्नसागरजी महाराज यांनी सांगीतले. आपल्या तप,आराधना,मौनव्रत व एकांतवास च्या साधनेला धरâन आचार्यश्री म्हणाले की, मौन हे अनेक समस्यांचे समाधान आहे. मौन मुळे प्रबळ इच्छा शक्ती व आत्मकल्याणास बळ मिळते. मनाला शांतता मिळते व कठोर साधना करण्याची शक्ती मिळते. आता यापुढे मौन मध्ये राहण्याचे मन करत आहे. माझ्या जीवनात ५ गोष्टी आहेत मौन, मंत्र, माळा, मानस व मुस्कुहराट सुख शांती प्रदान करत आहे. या पुढील अनुभव सांगताना आचार्यश्री म्हणाले की, ३२,  ३५, ५०, ६६, ८० व  १८६ मौन,उपवास एकांत वास करतांना मी एकच संकल्पना केली की हिंमतीने विजयी व्हायचे आहे. त्यामुळे हिंंमत न हरता पुढे जावे. मौन साधनेत मी सदैव अंतर्मनात एकांत वासात राहुन भगवंताची आराधना केली. भगवान महावीर हे ६६ दिवस मौन होते. मी तप आणि आराधना मध्ये असे अनुभव घेतले की, मौन व एकांत वास हे आपले खरे मित्र आहे असेही शेवटी प्रसन्नसागरजी महाराज यांनी सांगीतले. संपुर्ण कार्यकमाचे सुत्रसंचालन ब्र.तरâणभैया यांनी केले तर संपुर्ण कार्यकम सौम्यमुर्ती पियुषसागरजी महाराज यांच्या निर्देशानुसार संपन्न झाला. अशी माहिती प्रचार प्रसार प्रमुख नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल औरंगाबाद, रोमिल जैन सोनकच, मनोज पाटणी नाशिक  यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.                    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close