Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

काँग्रेसला आणखी एक धक्का; ‘या’आमदाराने सोडली साथ

गुजरात काँग्रेसचे आमदार बृजेश मेरजा यांचा आमदारकीचा राजीनामा

अहमदाबाद : १९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे आमदार बृजेश मेरजा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसला गुजरातमध्ये सातत्याने धक्के बसत आहेत, याआधी काँग्रेसच्या अक्षय पटेल आणि जीतू चौधरी यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. मार्चपासून आतापर्यंत काँग्रेसच्या तब्बल ७ आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. गुजरातमध्ये काँग्रेसकडे आता ६५ आमदारांचं संख्याबळ आहे.  यापार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी १९ जूनला होत असलेल्या निवडणुकीला मोठं महत्त्व आलं आहे. ४ पैकी ३ जागा सध्या भाजपकडे तर उर्वरित एक जागा काँग्रेसकडे आहे. भाजपाने राज्यसभेसाठी अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा आणि नरहारी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. आकडेवारीकडे पाहिली तर भाजपाच्या २ जागा सहज निवडून येतील पण तिसऱ्या जागेसाठी काही मतांची आवश्यकता भासणार आहे, त्यामुळे येत्या काळात गुजरातच्या राजकारणात आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close