Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून टॅक्‍टरच्‍या लाभार्थांला जिल्‍हाधिकारी यांच्या हस्ते चावीचे वितरण

    अकोला,दि. 24   स्‍व.कै.आ.मा.अण्‍णासाहेब पाटील यांचे 87 व्‍या जयंतीचे औचित्‍य साधून अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास  विकास महामंडळाकडून जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्‍ते अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या वैयक्‍तीक कर्ज व्‍याज परतावा या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांला टॅक्टर चाबीचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे, किमान कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी दत्‍तात्रय एकनाथ वावगे, अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक रो‍हीत बारस्‍कर, तसेच फार्मट्रॅक कंपनीचे विक्री प्रतिनिधी गणेश श्रीराम खेते व गोपाल खापरकर यांची उपस्थिती होती.

        अण्‍णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्‍या वैयक्‍तीक कर्ज व्‍याज परतावा या योजनेअंतर्गत कोटक महेंद्र बॅक कडून 5 लक्ष 75 हजार रुपये किंमतीच्या टॅक्टरची चाबी बाळापूर तालुक्यातील निंबा येथील शेतकरी गणेश नारायणराव देशमुख यांना देण्यात आली. कर्जावरील योजने अंतर्गत लार्भाथ्‍याला 12 टक्केपर्यत व्‍याजाचा परतावा महामंडळाकडून करण्‍यांत येतो. सदर योजने अंतर्गत 110 लाभार्थांनी 5 कोटी 49 लाख 22 हजार 225 एवढे अर्थसहाय्य विविध बॅकांकडून मंजूर करण्यात आले असून त्‍यावरील व्‍याजाचा परतावा महामंडळा कडून 32 लाख 38 हजार 156  एवढा लाभार्थाच्‍या खात्‍यात जमा करण्‍यांत आला. सदर योजना मराठा प्रवर्गाकरीता शासना कडून राबविण्‍यात येत असून या योजनेचा  जास्‍तीतजास्‍त लाभ स्‍वयंरोजगार सुरु करण्‍यास इच्‍छूक उमेदवारांनी घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी केले.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close