Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची अण्णांची मागणी
अहमदनगर : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत अण्णा हजारेंच्या मनधरीसाठी दाखल झाले आहेत. यापुर्वी माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुते यांनीदेखील अण्णांच्या मनधरीचे प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी

अण्णा हजारे म्हणाले की, ते 2018 पासून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची विनंती केंद्र सरकारला करत आहेत. परंतु, त्यांच्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहेत. यामुळेच उद्या म्हणजेच, 30 जानेवारीपासून अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत.

हेही वाचा मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव उतरलंय आंदोलनात:साष्टपिंपळगाववासीयांचा आत्मदहनाचा इशारा

या नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी

यापुर्वी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि राज्यातील विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची अण्णा यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close