Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

अंबानीच्या सुना सुद्धा करतात करोडोंची कमाई, जाणून घ्या श्लोका-राधिका किती करतात कमाई

अंबानीच्या सुना सुद्धा करतात करोडोंची कमाई, जाणून घ्या श्लोका-राधिका किती करतात कमाई

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ओळखतात. त्यांचा व्यवसाय तर जगभरामध्ये पसरला आहे. अंबानी फॅमिलीतील सर्व सदस्य म्हणजेच ईशा अंबानी पासून ते आकाश अंबानी पर्यंत सर्वजण आपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ठ काम करत आहेत आणि विशेष म्हणजे व्यवसायाच्या बाबतीत अंबानी फॅमिलीतील सुना देखील मागे नाही आहेत. चला तर मग सर्वात पहिला श्लोकाबद्दल जाणून घेऊयात.

आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहता देशातील मोठी हिऱ्याची कंपनी ब्ल्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रसेल मेहताची मुलगी आहे. आकाश अंबानी जिथे रिलायंस जियोची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत, तर त्यांची पत्नीसुद्धा व्यवसाय सांभाळण्यात कुणापेक्षाहि मागे नाही. २०१४ मध्ये श्लोका आपले वडील रसेल मेहताची कंपनी ब्ल्यू फाउंडेशनची डायरेक्टर बनली, जी तिच्या वडिलांच्या कंपनीचा एक भाग आहे.इतकेच नाही तर अंबानी फॅमिलीप्रमाणेच श्लोकासुद्धा सोशल अॅक्टिविटीजमध्ये खूपच पुढे आहे ती आपल्या व्यवसायासोबत एका संस्थेची सह-संस्थापक देखील आहे. जिचे नाव Connect For असे आहे. मिडिया रिपोर्टनुसार श्लोका मेहताचे एकूण उत्पन्न १८० लाख अमेरिकन डॉलर्स इतके आहे. म्हणजेच ती महिन्याला जवळ जवळ ८० लाख रुपये कमावते.

अंबानी फॅमिलीतील छोटा मुलगा अनंतबद्दल बोलायचे झाले तर तो आजकाल राधिका मर्चंटशी असलेल्या रिलेशनशिपबद्दल खूपच चर्चेमध्ये आहे. त्याला बऱ्याच वेळा सार्वजनिक ठिकाणी पाहिले गेले आहे आणि सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि निता अंबानी स्वतः राधिकाला खूप पसंत करते.राधिकाच्या फॅमिलीबद्दल बोलायचे झाले तर राधिका आणि तिची फॅमिली अंबानी फॅमिलीला अनेक वर्षांपासून ओळखते. राधिकाचे वडील विरेन मर्चंटचा स्वतःचा एक एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय आहे, २००२ मध्ये विरेनने Encore Health Services ची स्थापना केली आणि राधिका आपल्या वडिलांच्या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करते.

राधिका मर्चंटने केडार कंसलटेंट, देसाई अँड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट सारख्या कंपनीसोबतसुद्धा काम केले आहे. राधिकाने आपली एक फर्म देखील सुरु केली आहे.तर अंबानी फॅमिलीची सून श्लोका सध्या खूपच फेमस झाली आहे आणि जेव्हापासून राधिकाचे नाव अंबानी फॅमिलीशी जुडले आहे तेव्हापासून लोक तिलासुद्धा ओळखू लागले आहेत. तथापि राधिका आणि श्लोका दोघी एकमेकींपासून खूपच वेगळ्या आहेत. पण एक गोष्ट तर मानावी लागेल कि निता अंबानी आपल्या दोन्ही सुना श्लोका आणि होणारी सून राधिकावर मुलीसारखे प्रेम करते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close