Subscribe to our Newsletter
देशविदेश

माजी सैनिकांना नोकरी देण्यासाठी सैनिक पुनर्वसन महासंचालकासोबत अमेझॉन इंडियाचा करार

: अमेझॉन इंडिया ने त्यांच्या वाढत्या कामकाजामध्ये माजी सैनिकांना काम करण्याची संधी देण्यासाठीसैनिक पुनर्वसन महासंचालकासोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या भागीदारीसोबत, अमेझॉन इंडिया देशासाठी सेवा देणाऱ्या माजी सैनिकांना काम करण्याची पर्यायी संधी देणे कायम ठेवू इच्छिते. या सामंजस्य करारावर, लीजू थॉमस, एचआर संचालक, ग्राहक समाधान व कॉर्पोरेट, अमेझॉन इंडिया आणि मेजर जनरल एमके सागोच, महानिदेशक, डीजीआर यांनी स्वाक्षरी केली आहे.डीजीआरसोबत केलेल्या या सहयोगामुळे अमेझॉन इंडिया ला अनेक अनुभवी सैनिकांच्या वैविध्यपूर्ण अनुभवाला कामात आणता येऊ शकेल, त्यायोगे अधिक गुणवत्ता प्राप्त करण्यास मदत होईल. अनुभवी सैनिकांनादेखील कामाच्या विविध संधी उपलब्ध होतील ज्यामध्ये त्यांना फुलफीलमेंट सेंटर्स, सॉर्ट सेंटर्स, आणि वितरण केंद्रांमध्ये वैयक्तिक योगदान आणि व्यवस्थापनाची संधी यांचा समावेश आहे. या सहायक परिश्रमामुळे अमेझॉन भारत च्या सध्याच्या अनुभवी सैनिक रोजगार कार्यक्रम अधिक सर्वसमावेशक होईल.”आम्ही, अमेझॉन मध्ये, आमच्या कर्मचाऱ्यांमधली विविधता, समता, आणि सर्वसमावेशकता मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहोत. इथे प्रत्येक दृष्टिकोनासाठी किंमत आहे आणि त्यामुळे आमचीवाढ होण्यास मदत होते. सर्वसमावेशकतेसाठी आमचे दीर्घकालीन स्वप्न म्हणजे एक संतुलित कर्मचारी वर्ग विकसित करणे असे आहे. हा करार त्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे’ असे स्वाती रस्तोगी, एचआर संचालक, अमेझॉन इंडिया ऑपरेशन्स म्हणाल्या.त्या पुढे म्हणाल्या की, ” डीजीआरसोबत काम करण्यासाठी आणि भूदल, नौदल, आणि विमानदळ मधील अनुभवी सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबियांसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. 2025 पर्यंत 25,000 अनुभवी सैनिकांना काम देण्याच्या अमेझॉन च्या जागतिक ध्येयासोबतच, आम्ही उल्लेखनीय कौशल्यांना काम देणे आणि भविष्यामध्ये त्यांच्या सामर्थ्याला आणि प्रतिभेला फायदा देणाऱ्या संधी देणे सुरू ठेवणार आहोत.”कराराबद्दल बोलताना, मेजर जनरल एमके सागोच, डीजीआरचे महासंचालक म्हणाले की, ”आमचे अनुभवी सैनिक विविध क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये भरघोस विकास साधण्यासाठी, भरपूर अनुभवाने परिपक्व आहेत. अमेझॉन इंडिया ने सेनेतील माजी सैनिकांना कामाच्या संधी उपलब्ध करून अगोदरच एक उत्तम पाऊल टाकलेले आहे. हा करार करून, निरनिराळ्या माजी सैनिकांसाठी सार्थ कामाच्या संधी उपलब्ध होतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close